---Advertisement---

“युवा खेळाडूंमध्ये स्पार्क दिसला नाही”, धोनीच्या वक्तव्यावर ऋतुराज गायकवाडने सोडले मौन

On: बुधवार, नोव्हेंबर 25, 2020 7:56 PM
---Advertisement---

दोन आठवड्यांपूर्वी युएई येथे आयपीएलचा तेरावा हंगाम संपन्न झाला. आतापर्यंत आयपीएलच्या सर्व हंगामांत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाला यावेळी सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. संघाच्या खराब कामगिरीमुळे चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीवर अनेकांनी टीका केली होती. धोनीने स्पर्धेत सातवा पराभव स्वीकारल्यानंतर बोलताना म्हटले होते की, ‘युवा खेळाडूंमध्ये स्पार्क दिसला नाही.’ त्याच्या या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. आता, चेन्नईचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने धोनीच्या या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

धोनीच्या वक्तव्यावर ऋतुराजने सोडले मौन

आयपीएल २०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून सर्वाधिक प्रभावित करणारा खेळाडू म्हणून ऋतुराज गायकवाड समोर आला होता. धोनीच्या ‘युवा खेळाडूंमध्ये स्पार्क दिसला नाही’ या वक्तव्याविषयी एका वृत्तसंस्थेलाला दिलेल्या मुलाखतीत ऋतुराज म्हणाला, “मी त्याबाबत जास्त काही वाचले नाही. मात्र, मला वाटतं त्याच्या या विधानाचा विपर्यास केला गेला आहे. त्याला दुसरे काहीतरी म्हणायचे असेल, आणि लोकांनी दुसरा अर्थ काढला असेल. तो काय म्हणाला हे महत्त्वाचं नाही. तो सर्व युवा खेळाडूंना प्रोत्साहन देत असतो.”

धोनीला आवडते माझी फलंदाजी

ऋतुराजने धोनी आणि त्याच्यातील मैत्रीपूर्ण संबंध विषयी सांगताना म्हटले, “तो दरवेळी माझी फलंदाजी पाहायला नेटमध्ये यायचा. त्याला माझी फलंदाजी आवडते. फलंदाजी पाहताना तो सातत्याने मार्गदर्शनही करत असतो. त्याने मला सल्ला दिला होता की, तू हे नक्की ठरवं की तुला काय करायचे आहे. त्यानंतर निकाल काहीही लागो. धोनीचा हा सल्ला माझ्यासाठी मोलाचा होता.”

तीन अर्धशतके झळकावत केली होती लक्षणीय कामगिरी

तेवीस वर्षीय ऋतुराजने आपल्या दमदार कामगिरीने सर्व क्रिकेट चाहत्यांना आपलेसे केले होते. सुरुवातीच्या तीन सामन्यात सपशेल अपयशी ठरल्यानंतर, अखेरच्या तीन सामन्यात तीन अर्धशतके झळकावत तो प्रसिद्धीझोतात आला. चेन्नई सुपर किंग्स संघ ऋतुराजला पुढील वर्षासाठी आपल्या संघात कायम करू शकतो. शेन वॉटसनच्या निवृत्तीनंतर ऋतुराजने सलामीवीराच्या जागेवर आपला हक्क सांगितला आहे.

चेन्नईसाठी निराशाजनक ठरली आयपीएल‌ २०२०

यावर्षी प्रथमच चेन्नई सुपर किंग्स संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकला नाही. सीएसकेने १४ सामन्यांत केवळ १२ गुण मिळवत गुणतालिकेत सातवे स्थान मिळवले होते. एकीकडे सीएसकेचे वरिष्ठ आणि अनुभवी फलंदाज संपूर्ण हंगामात फ्लॉप झाले. तर, दुसरीकडे युवा खेळाडूंना स्पर्धेच्या सुरुवातीला अंतिम अकरामध्ये टप्प्यात फारशी संधी मिळाली नाही.

मराठीत माहिती –

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम करण्यास रॉस टेलर सज्ज

…तर भारतीय संघाला एकही कसोटी सामना जिंकता येणार नाही, मायकल क्लार्कची भविष्यावाणी

टी२०, कसोटी मालिकेआधीच न्यूझीलंडचे दोन स्टार खेळाडू पडले बाहेर; सँटेनर करणार नेतृत्व

ट्रेंडिंग लेख 

ऑस्ट्रेलियात सर्वाधिक शतके ठोकणारे ‘तीन’ विदेशी धुरंदर, दोन भारतीय कर्णधारांचा समावेश

बॅगी ग्रीन- कहाणी जगातील सर्वात प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन क्रिकेट कॅपची

विश्वास बसणार नाही! ‘हे’ तीन भारतीय ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकू शकले नाहीत वनडे शतक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---