---Advertisement---

BREAKING । थालाच्या चाहत्यांचं हर्टब्रेक! ऋतुराज बनला सीएसकेचा नवा कर्णधार

On: गुरूवार, मार्च 21, 2024 3:56 PM
---Advertisement---

एमएस धोनी याच्या जागी आयपीएल 2024 साठी चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवण्यात आले आहे. धोनी यावर्षी आयपीएलचा शेवटचा हंगाम खेळणार, असा चर्चा मागच्या मोठ्या काळापासून सुरू आहेत. अशातच गुरुवारी (21 मार्च) आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ऋतुराज सीएसकेचा कर्णधार बनल्याची माहिती मिळाली.

आयपीएलच्या बातम्यांसाठी आताच व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा!- इथे क्लिक करा

42 वर्षीय एमएस धोनी (MS Dhoni) भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिला. 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी केवळ आयपीएलमध्ये खेळत होता. आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणूनही धोनीची ओळख आहे. त्याच्या नेतृत्वात सीएसकेने सर्वाधिक 5 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. मागच्या काही वर्षांपासून धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेणार अशा चर्चा सुरू आहेत. पण आगामी हंगाम खरोखर धोनीसाठी शेवटचा ठरू शकतो. तसे संकेतच फ्रँचायझीकडून गुरुवारी दिले गेले.

आगामी आयपीएल हंगामासाठी गुरुवारी सर्व 10 संघांच्या कर्णधारांचे एकत्र फोटोशूट झाले. यावेळी सीएसकेचा कर्णधार म्हणून धोनी दिसणार, असा सर्वांचा समज होता. पण प्रत्यक्षात झाले वेगळेच. धोनीच्या जागी सीएसकेचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) याच्याकडे सोपवण्यात आले आहे. सीएसके आणि धोनीच्या चाहत्यांसाठी हा एकप्रकारे धक्का आहे.

सीएसके आणि एमएस धोनीने संघाच्या भविष्याचा विचार करून कर्णधारपद ऋतुराजच्या हातात सोपवल्याचे दिसते. त्याचप्रमाणे मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने आगामी हंगामासाठी संघाचे कर्णधारपद हार्दिक पंड्या याच्याकडे दिले आहे. अशात रोहित शर्मा यावर्षी आयपीएलमध्ये हार्दिकच्या, तर धोनी ऋतुराजच्या नेतृत्वात खेळताना दिसेल.

आयपीएल 2024साठी कर्णधारांचा फोटोशूट झाला, त्यामध्ये अजून एक महत्वाचा बदल पाहायला मिळाला. पंजाब
किंग्जचा कर्णधार म्हणून शिखर धवन ऐवजी जितेश शर्मा याने फोटोशूटला हजेरी लावली. अशात पंजाब देखील आगामी हंगामात नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार याचे स्पष्ट संकेत त्यातून मिळाले आहेत. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनल्यानंतर गुजरात टायटन्सने शुबमन गिल याच्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवले.

(RUTURAJ GAIKWAD APPOINTED AS THE CAPTAIN OF CSK….!!!!!)
बातमी अपडेट होत आहे…

महत्वाच्या बातम्या – 
IPL 2024 । यावर्षी धोनी शेवटचा आयपीएल हंगाम खेळणार, याची तीन प्रमुख कारणे
IPL 2024: चेपॉकवर कोण कुणाला भारी? धोनीची चेन्नई की विराटची आरसीबी, काय सांगतात आकडे?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---