---Advertisement---

ऋतुराज गायकवाडनं भारतीय गोलंदाजांनाच धुतलं! पहिल्या कसोटीपूर्वी फलंदाजीनं खळबळ

On: शनिवार, नोव्हेंबर 16, 2024 2:38 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पर्थ कसोटीच्या तयारीत व्यस्त आहे. टीम इंडिया तयारीसाठी मॅच सिम्युलेशनचा वापर करत आहे, ज्यामध्ये सामन्याप्रमाणेच क्षेत्ररक्षण लावल्या जातं. काल विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत आणि शुबमन गिलसारखे फलंदाज याद्वारे खेळताना दिसले. आज संघात नसलेल्या ऋतुराज गायकवाडला फलंदाजीची संधी मिळाली. यावेळी ऋतुराजनं अशी फलंदाजी केली की, जी पाहूण सर्वजण खूपच प्रभावित झाले.

ऋतुराजनं तासाभराहून अधिक काळ फलंदाजी केली. फलंदाजी दरम्यान तो खूपच आरामात दिसत होता. त्यानं आपल्या डावात तीन वेगवेगळ्या गोलंदाजांविरुद्ध चार षटकार ठोकले. ऋतुराजनं रविचंद्रन अश्विनला दोन षटकार आणि मानव सुथारला एक षटकार लगावला. याशिवाय हर्षित राणाच्या बाऊन्सरवर त्यानं पुल शॉट खेळत षटकार टोलावला. यानंतर ऋतुराजनं मैदान सोडलं आणि सरफराज खान त्याच्या जागी फलंदाजीला आला.

ऋतुराज गायकवाड भारत ‘अ’ संघासोबत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आला असून, येथे तो संघाचं नेतृत्व करत आहे. भारत ‘अ’ संघातील खेळाडूंच्या उपस्थितीमुळे मुख्य भारतीय संघाचा मोठा फायदा झाला आहे. भारत ‘अ’ संघाला ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्ध झालेल्या दोन्ही अनधिकृत कसोटी सामन्यात दारुण पराभवाला सामोरं जावं लागलंय. ऋतुराज या दोन्ही सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरला होता.

पहिल्या कसोटीत ऋतुराजनं दोन्ही डावात 0 आणि 5 धावा केल्या. यानंतर दुसऱ्या कसोटीत त्यानं सलामी सोडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तो चौथ्या क्रमांकावरही फ्लॉप राहिला. दुसऱ्या कसोटीतही तो केवळ 4 आणि 11 धावा करू शकला. दोन्ही सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर ऋतुराजला बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी मुख्य संघात स्थान मिळणं कठीण आहे. मात्र बॅकअप म्हणून त्याला संघात कायम ठेवता येईल.

हेही वाचा – 

याला म्हणतात ‘देशप्रेम’! सूर्यकुमार यादवनं असे काही केलं ज्याने सर्वांचे मन जिंकले, पाहा VIDEO
कर्णधार असावा तर असा! तिलक वर्मासाठी सूर्यानं केला मोठा त्याग, जाणून घ्या
“याबद्दल कॅप्टन सूर्याचे आभार… “, मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर तिलक वर्मा काय म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---