आयपीएल २०२१ स्पर्धेचा ४७ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड याने चौफेर फटकेबाजी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियममध्ये ऋतुराजने आपल्या खेळीने वादळ आणले होते. या खेळीनंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी त्याचे कौतुक केले आहे. परंतु एका दिग्गज भारतीय खेळाडूची मात्र चिंता वाढली आहे.
आयपीएल स्पर्धेत ऋतुराजचे पहिले वहिले शतक
ऋतुराज गायकवाडने या डावात ६० चेंडूंमध्ये १६८.३३ च्या स्ट्राइक रेटने नाबाद १०१ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ९ चौकार आणि ५ षटकार मारले होते. या खेळीची सर्वात खास गोष्ट म्हणजे, तो ९५ धावांवर फलंदाजी करत असताना त्याच्याकडे शतक पूर्ण करण्यासाठी एकच चेंडू शिल्लक होता. त्यावेळी २० व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने षटकार मारून आपले पहिले वहिले शतक झळकावले होते.
‘या’ खेळाडूची वाढली चिंता
ऋतुराज गायकवाडने आयपीएल २०२१ स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. यात काहीच शंका नाही की, जर त्याने अशी कामगिरी पुढे ही सुरू ठेवली तर तो सलामीवीर फलंदाज म्हणून भारतीय संघात स्थान मिळवू शकतो. पुढे जाऊन जर असे झाले तर, भारतीय संघातून रोहित शर्माचा पत्ता कट होऊ शकतो. रोहित आयपीएल २०२१ स्पर्धेत पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. तसेच रोहित ३४ वर्षांचा झाला आहे. यामुळे संघ व्यावस्थपक युवा खेळाडूंना संधी देऊ शकतात. त्यावेळी ऋतुराज गायकवाड रोहित शर्माची जागा घेण्यासाठी प्रबळ दावेदार असू शकतो.
ऑरेंज कॅपवर ऋतुराजचा ताबा
ऋतुराज गायकवाडने आयपीएल २०२१ स्पर्धेत आतापर्यंत लक्षवेधी कामगिरी केली आहे. त्याने या स्पर्धेतील १२ सामन्यात ५०.८० च्या सरासरीने ५०८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि ३ अर्धशतक झळकावले आहेत. यासह तो ऑरेंज कॅपचा मानकरी बनला आहे. ऋतुराज गायकवाडने आयपीएल २०२० स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघासाठी पदार्पण केले होते. त्याच्या आयपीएल स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत एकूण १८ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ५०.८५ च्या सरासरीने ७१२ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने १ शतक आणि ६ अर्धशतक झळकावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आधी सीएसकेविरुद्ध १९ चेंडूत झळकावलं तूफानी अर्धशतक, नंतर धोनीकडून यशस्वीला ‘ग्रेटभेट’
प्लेऑफचे सामने सुरू होण्यापूर्वी सीएसकेला मोठा धक्का, ४ अर्धशतक ठोकणारा ‘हा’ फलंदाज जखमी
इथेच अडलीय गाडी; दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर रोहितचं पडलं तोंड, सांगितली कुठे होतेय चूक?