चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड हा आयपीएल २०२१ स्पर्धेत चांगल्याच फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आला होता. त्याने सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ७५ धावांची महत्त्वाची खेळी केली होती. या खेळीमुळे त्याची सर्वच स्तरातून जोरदार प्रशंसा झाली होती. तसेच आता आयपीएल २०२१ स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. तरीदेखील ऋतुराज गायकवाड सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे. त्याने केलेली एक कमेंट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
ऋतुराज गायकवाड क्रिकेटच्या मैदानावर आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच तो मैदानाच्या बाहेर आपल्या स्टाइल आणि लूक्ससाठी देखील तितकाच प्रसिद्ध आहे. तो सोशल मीडियावर देखील प्रचंड ॲक्टिव असतो. नुकतीच त्याने मराठी अभिनेत्री सायली संजीव हिच्या फोटोवर कमेंट केली आहे, जी चाहत्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून आहे.
https://www.instagram.com/p/COZchb-l51-/?igshid=1ws5eo8thsg9p
सायलीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही नवीन फोटोज् शेअर केले होते. ज्यावर ऋतुराज गायकवाडने “वोह..” अशी कमेंट केली आहे. या कमेंटला प्रतिसाद देत सायलीने हार्टचा ईमोजी शेअर केला होता.

सायलीने यापुर्वीही केली होती कमेंट
कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस यांच्या तुफानी खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्ज संघाला १८ धावांनी विजय मिळवण्यात यश आले होते. या सामन्यात ऋतुराजने ६४ धावांची खेळी केली होती. या सामन्यानंतर त्याने सामन्यातील एक फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता, ज्यावर सायलीने हार्टचा ईमोजी शेअर केला होता. त्यामुळे दोघांचाही कमेंट गेम पाहून चाहत्यांना यांच्यात काहीतरी सुरू आहे का? असा प्रश्न पडला आहे.
https://www.instagram.com/p/CN8WLvhrTt0/?igshid=zy7q9p1j2zh9

कोण आहे सायली संजीव?
ऋतुराज गायकवाडच्या कमेंट बॉक्समध्ये झळकणारी सायली संजीव हीने प्रसिद्ध मराठी मालिका ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तसेच आता ती कलर्स मराठी चॅनेलवर प्रदर्शित होत असलेल्या ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेत काम करत आहे. लवकरच तिचा नवीन चित्रपट ‘झिम्मा’ प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये ती बोल्ड अवतारात दिसून येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! ‘या’ माजी क्रिकेपटूचं अपहरण, बंदुकीचा धाक दाखवत करण्यात आली मारहाण
कोरोना काळात आयपीएलद्वारे कमावलेले १००० कोटी कोविड-१९ रुग्णांसाठी दान करा, वकिलाने दाखल केली याचिका
‘सर रविंद्र जडेजा नको, मला फक्त..’, आपले कौतुक करणाऱ्या समालोचकाला जड्डूचे मन जिंकणारे उत्तर





