पुणेकर ऋतुराज गायकवाड इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात चांगलाच चमकला. ऋतुराजने या सामन्यात अर्धशतक करत आयपीएल 2023मधील पहिले-वहिले अर्धशतक झळकावण्याचा मान मिळवला. विशेष म्हणजे, चेन्नईच्या खेळाडूने आयपीएल 2020 ते 2023 हंगामातील पहिले अर्धशतक करण्याची चौथी वेळ ठरली. चला सविस्तर जाणून घेऊयात…
ऋतुराजचे वादळी अर्धशतक
झाले असे की, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) रंगलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाचा हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. यावेळी चेन्नईची सुरुवात जरा खराब झाली. संघाला 14 धावांवर डेवॉन कॉनवेच्या रूपात पहिला झटका बसला. मात्र, सलामीला उतरलेल्या ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने एका बाजूने संघाची खिंड लढवत अर्धशतक पूर्ण केले.
First FIFTY of #TATAIPL 2023 goes to @Ruutu1331 😎
He brings his half-century with a MAXIMUM and the #CSK opener is looking in solid touch 🔥
Follow the match ▶️ https://t.co/61QLtsnj3J#GTvCSK pic.twitter.com/il3aTywYSA
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2023
ऋतुराज गायकवाड याने सामन्यात अवघ्या 23 चेंडूत 50 धावा केल्या. या धावा करताना त्याने 3 चौकार आणि 5 षटकारही भिरकावले.
चेन्नईवीरांचे अर्धशतक
विशेष म्हणजे, ऋतुराजने आयपीएल 2023 स्पर्धेचे पहिले अर्धशतक करताच, तो आयपीएलच्या हंगामात पहिले अर्धशतक करणारा चेन्नईचा चौथा फलंदाज ठरला. त्यापूर्वी 2020मधील पहिले अर्धशतक चेन्नईच्याच अंबाती रायुडू याने केले होते. त्यानंतर 2021च्या उद्घाटनाच्या सामन्यात चेन्नईसाठी पहिले अर्धशतक करण्याचा पराक्रम सुरेश रैना (Suresh Raina) याने केला होता. त्यानंतर आयपीएल 2022च्या दुसऱ्या सामन्यात चेन्नईसाठी पहिले अर्धशतक करण्याचा मान एमएस धोनी (MS Dhoni) याला मिळाला होता.
चेन्नईसाठी पहिले अर्धशतक करणारे खेळाडू
आयपीएल 2020- अंबाती रायुडू
आयपीएल 2021- सुरेश रैना
आयपीएल 2022- एमएस धोनी
आयपीएल 2023- ऋतुराज गायकवाड*
चेन्नईची 13 षटकानंतरची धावसंख्या
चेन्नई सुपर किंग्स संघाने 13 षटकांचा खेळ संपल्यानंतर 4 विकेट्स गमावत 121 धावा चोपल्या. यामध्ये मोईन अली 23 धावा करून बाद झाला, तर अंबाती रायुडू याला 12 धावांचे योगदान देता आले. त्याच्याव्यतिरिक्त बेन स्टोक्स 7 धावांवर बाद झाला. तसेच, ऋतुराज गायकवाड 76 धावांवर नाबाद होता. या धावा त्याने 36 चेंडूत 4 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने केलेल्या. तसेच, ऋतुराजला साथ देण्यासाठी शिवम दुबेही खेळपट्टीवर आहे. (Ruturaj Gaikwad Hit Fifty In just 23 balls against gt In ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विकेट एक, विक्रम अनेक! शमीने कॉनवेच्या दांड्या उडवताच नावावर झाले खास रेकॉर्ड, पाहा व्हिडिओ
IPL 2023 । कर्णधार रोहितवर जोफ्रा आर्चर पडतोय भारी, नेट्समध्ये करतोय कहर गोलंदाजी