देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफीचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळले जात आहेत. सोमवारी (28 नोव्हेंबर) महाराष्ट्र विरुद्ध उत्तर प्रदेश यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा दुसरा सामना खेळला गेला. ज्यामध्ये ऋतुराज गायकवाड याने द्विशतकी खेळी करत संघाला तीनशेच्या पार नेले. यादरम्यान त्याने एकाच षटकात तब्बल सात षटकार ठोकण्याची विश्वविक्रमी कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीसाठी त्याचे कौतुक होत असतानाच, त्याने ज्या गोलंदाजाविरुद्ध ही कामगिरी केली त्याच्याबद्दल जाणून घेणेदेखील गरजेचे आहे.
7 sixes in a single over by Ruturaj Gaikwad in Vijay Hazare Quarter-Final. pic.twitter.com/iS9ZqTddiP
— Johns. (@CricCrazyJohns) November 28, 2022
संपूर्ण स्पर्धेत शानदार फॉर्ममध्ये असलेल्या ऋतुराजने या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राला मोठी धावसंख्या उभारून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्याने 138.36च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या. त्याने 159 चेंडूत नाबाद 220 धावा केल्या. यामध्ये 10 चौकार आणि 16 षटकांराचा समावेश होता. त्याने डावाच्या 49 व्या षटकात हे सात षटकार मारले. त्याच्या गोलंदाजीवर ऋतुराजने एकूण 9 षटकार खेचले.
Weirdo…!! Have a close look..!! pic.twitter.com/jK6ChzyH2T
— Bishan Bedi (@BishanBedi) November 7, 2018
ऋतुराजने ज्या गोलंदाजाविरुद्ध ही कामगिरी केली त्याचे नाव शिवा सिंग आहे. शिवा हा भारतीय क्रिकेट वर्तुळातील अतिशय मोठा क्रिकेटपटू नसला तरी, उत्तर प्रदेश संघाचा महत्त्वाचा भाग आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज असलेला शिवा 2018 अंडर नाईन्टीन विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य होता.
त्याच वर्षी तो आणखी एका वेगळ्याच घटनेमुळे चर्चेत आला. अंडर 23 स्पर्धेत बंगाल विरुद्ध गोलंदाजी करताना त्याने स्वतःभोवती फिरत चेंडू टाकला होता. त्याच्या या 360 डिग्री चेंडूला पंचांनी मात्र अवैध ठरवले होते. त्यावर शिवाने आक्षेप नोंदवला होता. त्यावर काही खेळाडूंनी त्याला पाठिंबाही दिलेला. असे असले तरी तो उत्तर प्रदेश संघाचा नियमित फिरकीपटू आहे.
(Ruturaj Gaikwad Hits 7 Sixes Shiva Singh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाद करा पण आमचा कुठं! ऋतुराज गायकवाडचा नाबाद द्विशतकी धमाका
वनडे विश्वचषक 2023साठी भारत, अफगाणिस्तानबरोबर ‘हे’ सहा संघ पात्र; दोन चॅम्पियन्स संघाना करावे लागणार श्रम