भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी-20 सामना गुवाहाटीमध्ये खेळला गेला. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला या सामन्यात प्रथम फलंदाजी करावी लागली. भारतीय संघाने या संधीचा फायदा घेत निर्धारित 20 षटकांमध्ये 222 धावा उभारल्या. भारतीय संघासाठी सलामीवीर व उपकर्णधार ऋतुराज गायकवाड याने नाबाद शतक झळकावले. यासोबतच 28 नोव्हेंबर या दिवशी सलग दुसऱ्या वर्षी त्याने संस्मरणीय कामगिरी करून दाखवली.
ऋतुराजने आपल्या डाव्याची सुरुवात अत्यंत सावधगिरीने केली. त्याने आपल्या पहिल्या 21 चेंडूवर केवळ 21 धावा बनवलेल्या. त्यानंतर त्याने मोठे फटके खेळत 32 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 52 चेंडूंमध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक पूर्ण केले. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहताना 57 चेंडूंमध्ये 123 धावा केल्या. यामध्ये 13 चौकार व 7 षटकारांचा समावेश होता. भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये शतक झळकावणारा तो नववा फलंदाज ठरला.
https://twitter.com/CSK_Zealots/status/1729533383867506693?t=w182v3GkTtGySLf6wo4I2A&s=19
मागील वर्षी देखील ऋतुराजने 28 नोव्हेंबर या दिवशीच एक ऐतिहासिक कामगिरी केली होती. विजय हजारे ट्रॉफी मध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध खेळताना त्याने तुफानी शतक झळकावलेले. या शतकादरम्यान त्याने फिरकीपटू शिवा सिंग यांच्या एका शतकात तब्बल सात षटकार खेचण्याची कामगिरी त्याने करून दाखवली होती.
(Ruturaj Gaikwad Lucky On 28 November Now Hit Century And Last Year Hits 7 Sixes)
महत्वाच्या बातम्या –
तिसऱ्या टी20 पूर्वी सुट्टी घेत मुकेश कुमार पोहोचला घरी, ‘हे’ आहे कारण, चहर संघात सामील
INDvAUS: तिसऱ्या टी20 मध्ये टीम इंडियाची प्रथम फलंदाजी, अशी आहे प्लेईंग इलेव्हन





