---Advertisement---

‘त्याचं करियर बरबाद करताय’, पहिल्या टी२० सामन्यांत ऋतुराजला संधी न दिल्याने भारतीय संघव्यवस्थापन ट्रोल

ruturaj-gaekwad
---Advertisement---

कोलकाता| भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात सध्या ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. ही मालिका ईडन गार्डन्स स्टेडियमवर होत असून या मालिकेतील पहिला सामना बुधवारी पार पडला. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ६ विकेट्सने विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, या सामन्यासाठी युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड याला भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते, त्यामुळे सोशल मीडियावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या. 

ऋतुराजला बदली खेळाडू म्हणून मिळाली टी२० मध्ये
खरंतर सुरुवातीला ऋतुराजचा वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघात समावेश नव्हता. मात्र, या मालिकेपूर्वी केएल राहुल दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्याऐवजी ऋतुराजला संघात संधी देण्यात आली. पण, असे असले तरी पहिल्या टी२० सामन्यासाठी अंतिम ११ जणांच्या संघात ऋतुराजला स्थान मिळाले नाही.

सोशल मीडियावरून भारतीय संघव्यवस्थापन ट्रोल
पहिल्या टी२० सामन्यासाठी केएल राहुलच्या अनुपस्थितीत भारतीय संघव्यवस्थापनाकडे कर्णधार रोहित शर्माबरोबर सलामीला फलंदाजीसाठी इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड असे दोन पर्याय होते. मात्र, भारतीय संघव्यवस्थापनाने इशानला पसंती दिली. त्यामुळे ऋतुराजच्या चाहत्यांना ही गोष्ट आवडली नाही, त्यामुळे सोशल मीडियावर भारतीय संघव्यवस्थापनाला ट्रोल करण्यात आले.

खरंतर ऋतुराज सातत्याने भारतीय संघात स्थान मिळवत आहे, मात्र त्याला अंतिम ११ जणांच्या संघात तितकी सातत्याने संधी दिली जात नाहीये. त्याचमुळे भारतीय संघव्यवस्थापन अधिक ट्रोल होत आहे. ऋतुराजची वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीही निवड झाली होती. पण त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला पहिल्या २ सामन्यात खेळता आले नाही, तर तिसऱ्या सामन्यासाठी त्याची अंतिम ११ जणांमध्ये निवड झाली नाही. त्यामुळे चाहत्यांनी बीसीसीआयवर ऋतुराजची कारकिर्दीचे नुकसान करत असल्याचा आरोप केला आहे.

https://twitter.com/SimpleAwasthi/status/1494054667286122496

https://twitter.com/shersinghboy/status/1494045383126704130

ऋतुराजची शानदार फॉर्ममध्ये
ऋतुराज गेल्या काही महिन्यांपासून दमदार फॉर्ममध्ये आहे. त्याने २०२१ आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप पटकावली होती. त्याने या हंगामात ४५.३५ च्या सरासरीने १ शतक आणि ४ अर्धशतकांसह ६३५ धावा केल्या. त्याला चेन्नईने २०२२ आयपीएल हंगामासाठीही संघात कायम केले आहे.

तसेच त्याने विजय हजारे ट्रॉफी २०२१-२२ स्पर्धेत देखील सर्वाधिक धावा करताना ४ शतकांसह ६०३ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही चांगली कामगिरी केली होती.

ऋतुराजची कारकिर्द
ऋतुराजने गेल्यावर्षी श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने २ आंतरराष्ट्रीय टी२० सामने आत्तापर्यंत खेळले असून ३५ धावा केल्या आहेत. तसेच त्याने आत्तापर्यंत २१ प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात ३८.५४ च्या सरासरीने ४ शतके आणि ६ अर्धशतकांसह १३४९ धावा केल्या आहेत. तसेच अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने ५४.७३ च्या सरासरीने ६४ सामन्यात ३२८४ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने ६२ टी२० सामन्यात २०७० धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

…आणि एबी डिविलियर्सचे ते स्वप्न अखेर अपुर्णच राहिलं!

वनडेतील सर्वोत्तम खेळी तर कसोटी पदार्पणात शतक, ईडन गार्डन्सवर रोहित शर्माने केली आहे अशी कामगिरी

मित्रप्रेम की योगायोग? १७ फेब्रुवारी डिविलियर्स आणि डू प्लेसिससाठी खास दिवस

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---