नुकताच इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम पार पडला आहे. एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाने यंदा आयपीएल चषकावर आपले नाव कोरले आहे. पूर्ण हंगामातील सातत्यपूर्ण कामगिरीनंतर पहिल्या क्वालिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्सवर मात करत चेन्नईने सर्वात आधी अंतिम सामन्यात धडक मारली होती. त्यानंतर अंतिम सामन्यातही विलक्षण खेळ दाखवत चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सला २७ धावांची छोबीपछाड दिला आणि चौथ्यांदा आयपीएल चषक उंचावला.
चेन्नई संघाच्या या यशामागे सलामीवीर आणि युवा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड याचा मोठा वाटा राहिला. त्याने चेन्नई संघाचे प्रतिनिधित्व करताना हंगामात सर्वाधिक धावा चोपत ऑरेंज कॅप जिंकली आहे. संघाला विजयी बनवून घरी परतल्यानंतर ऋतुराजचे मोठ्या गाजावाज्यासह स्वागत करण्यात आले आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
ऋतुराज हा पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील रहिवासी आहे. आयपीएल संपल्यानंतर ऋतुराजचे रविवारी (१७ ऑक्टोबर) पुण्यातील पिंपरी चिंचवडच्या घरी आगमन झाले. त्यावेळी पुणेकरांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले. आपल्या कारमधून ऋतुराज कॉलनीत पोहोचताच मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर त्याच्या आईने त्याची आरती केली. तसेच फुले उधळून त्याचे जंगी स्वागत करण्यात आले.
घरी परतला तेव्हा ऋतुराज गाडीतून रिकाम्या पायाने उतरला होता. यावेळी साधेपणा आणि परंपरेला जपणारा ऋतुराज सर्वांना आवडला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
https://www.instagram.com/p/CVH6Px8h-je/?utm_source=ig_web_button_share_sheet
Ruturaj Gaikwad Receives Grand Welcome @Ruutu1331 @ChennaiIPL ???????? https://t.co/X651FGhopW
— ???? (@StanMSD) October 17, 2021
चेन्नईच्या विजयात ऋतुराजचा मोलाचा वाटा
चेन्नई संघासाठी ऋतुराजची कामगिरी यंदाच्या हंगामात सर्वात महत्त्वाची ठरली. त्याने १६ सामन्यांत ४५.३५ च्या सरासरीने ६३५ धावा केल्या. यामध्ये १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. यासह त्याने यंदाच्या हंगामातील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला मिळणारी ऑरेंज कॅपही पटकावली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सीएसकेला ४ ट्रॉफी जिंकवणाऱ्या ‘थाला’ला आयपीएल २०२२मध्ये रिटेन करणार? सीएसकेकडून आले उत्तर
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने भारत सुरू करणार टी२० विश्वचषकाचा महारणसंग्राम, पाहा संपूर्ण वेळापत्रक
पाकिस्तानला ना रोहित ना विराटची भिती; कर्णधार आझम म्हणाला, ‘या’ मातब्बर फलंदाजासाठी करतोय तयारी






