---Advertisement---

सीएसकेच्या खेळाडूंनी दिलेल्या सन्मानाने भारावला ऋतुराज, हॉटेल स्टाफकडूनही जंगी स्वागत; पाहा व्हिडिओ

On: बुधवार, सप्टेंबर 22, 2021 4:12 PM
---Advertisement---

रविवारी (१९ सप्टेंबर) इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना प्रारंभ झाला होता. स्पर्धेतील पहिलीच लढत मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पार पडली होती. हे दोन्ही संघ जेव्हा आमने सामने येतात तेव्हा चाहत्यांना हाय व्होल्टेज सामना पहायला मिळत असतो. या सामन्यात देखील असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला होता.

मुंबईने अवघ्या २४ धावांवर चेन्नईच्या ४ फलंदाजांना बाद करत माघारी धाडले होते. परंतु त्यानंतर ऋतुराज गायकवाडने तुफानी खेळी करत नाबाद ८८ धावा केल्या होत्या. यासह चेन्नईला या सामन्यात जोरदार पुनरागमन करून दिले होते. या खेळीनंतर संघाच्या हॉटेलमध्ये ऋतुराज गायकवाडचे जोरदार स्वागत करण्यात आले, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यात झालेल्या सामन्यात ऋतुराज गायकवाड सामन्याचा शिल्पकार ठरला होता. चेन्नई संघ अडचणीत असताना ऋतुराज गायकवाडने ५८ चेंडूंमध्ये नाबाद ८८ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्स संघाला २० षटक अखेर १५६ धावा करण्यात यश आले होते. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघाला अवघ्या १३६ धावा करता आल्या आणि हा सामना चेन्नई सुपर किंग्स संघाने २० धावांनी आपल्या नावावर केला होता.

जेव्हा चेन्नई सुपर किंग्स संघ मुंबईला पराभूत करून संघाच्या हॉटेलमध्ये पोहोचला. त्यावेळी सुरेश रैना आणि संघातील इतर खेळाडूंनी ऋतुराजला सर्वात आधी हॉटेलमध्ये जाण्यास सांगितले. ज्यावेळी त्याने हॉटेलमध्ये प्रवेश केला, त्यावेळी हॉटेल स्टाफ आणि हॉटेलमधील इतर सदस्यांनी त्याचे टाळ्या वाजवून कौतुक केले. सर्वांनी केलेले हे भव्य स्वागत पाहून ऋतुराज गायकवाड देखील भावुक झाला होता.

या विजयासह चेन्नई सुपर किंग्स संघाने पुन्हा एकदा आयपीएल २०२१ स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाने आतापर्यंत एकूण ८ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांना ६ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे; तर २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाचा पुढील सामना शुक्रवारी ( २४ सप्टेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

विजयाच्या जल्लोषावर ‘विरजण’! पंजाबला धूळ चारल्यानंतर ‘या’ कारणामुळे संजूला १२ लाखांचा दंड

हारी हुई बाजी को जीतना हमें आता है! शेवटच्या २ षटकांत ‘असा’ झाला सामन्यात उलटफेर, सॅमसनचा खुलासा

टी२० विश्वचषकासाठी राखीव खेळाडूंमध्येही नाही मिळालं स्थान, युएईतील पहिल्याच सामन्यात ‘त्याने’ केला कहर 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---