---Advertisement---

धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर ‘असे’ होते सीएसके संघातील वातावरण, ऋतुराजने केला खुलासा

On: गुरूवार, जून 3, 2021 10:46 PM
Ruturaj Gaikwad and MS Dhoni
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याने मागीलवर्षी १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या १६ वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीनंतर त्याने हा निर्णय घेतलेला. त्यानंतर जगभरातील धोनीचे तमाम चाहते दुःखी झालेले. धोनीने ज्यावेळी निवृत्तीची घोषणा केली त्यावेळी तो चेन्नईमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघासह आयपीएल २०२० ची तयारी करत होता. यावेळी त्या ठिकाणी असलेला चेन्नईचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड याने धोनीने जेव्हा ही घोषणा केली तेव्हा संघातील वातावरण काय होते याविषयी खुलासा केला.

ऋतुराजचा त्या घटनेविषयी खुलासा
देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा तसेच आयपीएलमध्ये धोनी नेतृत्व करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य असणारा ऋतुराज गायकवाड याने नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्याने धोनीने निवृत्ती घेतली त्यावेळी संघातील वातावरण काय होते? याबाबत खुलासा केला.

ऋतुराज म्हणाला, “तो १५ ऑगस्ट २०२०चा दिवस होता आणि आम्ही चेन्नई येथे सरावात व्यस्त झालेलो. काही दिवसात आयपीएलसाठी आम्ही दुबईला रवाना होणार होतो. संध्याकाळी सराव संपल्यानंतर आम्ही सर्वांनी सोबत जेवण केले. जेवण झाल्यावर माही भाई आतमध्ये निघून गेले. आम्ही इतर सर्वजण एकत्र बसलेलो असताना कोणीतरी इन्स्टाग्राम पाहिले आणि म्हटले की, माही भाईंनी सेवानिवृत्तीची घोषणा केली आहे. तोपर्यंत कोणालाही याबाबत कल्पना नव्हती की ते निवृत्ती घेणार आहेत.”

“याबद्दल कोणतीही चर्चा झालेली नव्हती. कोणाला काहीही समजत नव्हते. आमच्यापैकी कोणीही त्यावेळी जाऊन त्यांना याबाबत विचारू शकत नव्हतो. कारण त्यावेळी ते थोडासे दु:खी झालेले. या सर्वातून बाहेर येण्यास आम्हाला एक दिवस लागला,” असे त्याने पुढे सांगितले.

धोनीने निवृत्ती स्वीकारल्यानंतर अगदी काही वेळातच त्याचा संघसहकारी सुरेश रैना याने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकलेला.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल २०२१च्या उर्वरित हंगामात ‘अशी’ असेल सर्व फ्रँचायझींची प्लेइंग इलेव्हन

कसोटी पदार्पणात द्विशतक करत किवी सलामीवीराने मारलं मैदान, मग केला ‘हा’ नकोसा विक्रम

पदार्पणात ठरले फ्लॉप अन् कायमची झाली सुट्टी, ‘या’ भारतीयांचे पुनरागमन अशक्य!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---