---Advertisement---

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचा विश्वविक्रम! विराट कोहलीसह ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाला टाकलं मागे

On: गुरूवार, जानेवारी 8, 2026 6:28 PM
---Advertisement---

भारतीय फलंदाज ऋतुराज गायकवाडने (Ruturaj gaikwad) क्रिकेटच्या इतिहासात नव्या विक्रमाची नोंद केली आहे. 8 जानेवारी रोजी विजय हजारे ट्रॉफीमध्ये गोव्याविरुद्ध खेळताना ऋतुराजने 134 धावांची धडाकेबाज खेळी केली. हे त्याच्या लिस्ट-A (एकदिवसीय घरगुती क्रिकेट) करिअरमधील 20 वे शतक आहे. मात्र, त्याने केवळ शतकांचा विक्रम केला नसून, तो आता लिस्ट-A क्रिकेटमध्ये जगातील सर्वात जास्त सरासरीने (Average) धावा करणारा फलंदाज बनला आहे.

लिस्ट-A क्रिकेटमध्ये किमान 50 डाव खेळणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऋतुराज आता अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी महान फलंदाज माइकल बेवन (Micheal Bevan) यांचा विक्रम मोडला आहे.

लिस्ट-A क्रिकेटमधील सर्वाधिक सरासरी:
58.83 – ऋतुराज गायकवाड (95 डावात 5,060 धावा)
57.86 – मायकल बेवन (ऑस्ट्रेलिया)
57.76 – सॅम हईन (इंग्लंड)
57.27 – विराट कोहली (भारत)
57.01 – चेतेश्वर पुजारा (भारत)

ऋतुराज गायकवाड सध्या विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये महाराष्ट्रासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत 7 डावांमध्ये 82.60 च्या सरासरीने 413 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.

इतकी उत्कृष्ट कामगिरी करूनही, ऋतुराजला न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. श्रेयस अय्यरच्या (Shreyas iyer) अनुपस्थितीत त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या क्रमांकावर खेळताना शतक झळकावले होते. मात्र, आता उपकर्णधार श्रेयस अय्यर परतल्यामुळे संघात सलामीला किंवा मधल्या फळीत जागा नसल्याचे कारण देत गायकवाडला संघातून वगळण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---