भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अद्याप विजय मिळवू शकलेला नाही. भारतीय संघाप्रमाणेच सलामीवीर ऋतुराज गायकवाड याची बॅटही पहिल्या २ सामन्यात शांत दिसली होती. परंतु विशाखापट्टणम येथे झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यातून त्याने दमदार पुनरागमन केले. या सामन्यात त्याने धुव्वादार अर्धशतक झळकावले आहे.
पहिले सलग २ सामने गमावल्यानंतर भारतीय संघ ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत ०-२ ने पिछाडीवर होता. त्यामुळे भारतीय संघाला (Team India) हा सामना जिंकणे गरजेचे होते. अशात या महत्त्वपूर्ण सामन्यात भारताचे सलामीवीर ऋतुराज (Ruturaj Gaikwad) आणि इशान किशन यांनी मिळून संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्यातही ऋतुराजने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेत अर्धशतकाला गवसणी घातली.
३५ चेंडूत ५७ धावांची विस्फोटक खेळी (Ruturaj Gaikwad Half Century) त्याने केली. या खेळीदरम्यान त्याने २ षटकार आणि ७ चौकारही मारले. हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि टी२० क्रिकेट कारकिर्दीमधील पहिलेवहिले अर्धशतक ठरले आहे. ऋतुराजने २०२१ मध्ये जुलै श्रीलंकेविरुद्ध टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
5⃣0⃣ for @Ruutu1331! 👏 👏
A superb knock from the right-hander as he brings up his maiden international half-century. 👌 👌
Follow the match ▶️ https://t.co/mcqjkCj3Jg #TeamIndia | #INDvSA | @Paytm pic.twitter.com/rNfaSVWWVw
— BCCI (@BCCI) June 14, 2022
याखेरीज इशान किशननेही ऋतुराजला साथ देत ३५ चेंडूत २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५४ धावांची शानदार खेळी केली. हे त्याचे चालू टी२० मालिकेतील दुसरे अर्धशतक होते. ऋतुराज आणि इशानमध्ये पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी झाली. तसेच अर्धशतके करत दोन्हीही सलामीवीर एका खास यादीतही सहभागी झाले आहेत. २०२० नंतर टी२० क्रिकेटमध्ये भारतासाठी ५० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या सलामी जोडींच्या यादीत त्यांचे नाव जोडले गेले आहे.
या यादीत केएल राहुल-शिखर धवन, रोहित शर्मा-विराट कोहली आणि केएल राहुल-रोहित शर्मा, या जोड्यांची नावे आहेत.
२०२०पासून टी२०मध्ये दोन्ही सलामीवीरांच्या भारतासाठी ५०+ धावा:
केएल राहुल-धवन: वि. श्रीलंका, पुणे (२०२०)
रोहित-कोहली: वि. इंग्लंड, अहमदाबाद (२०२१)
केएल राहुल-रोहित: वि. अफगाणिस्तान, अबू धाबी (२०२१)
केएल राहुल-रोहित: वि. नामिबिया, दुबई (२०२१)
केएल राहुल-रोहित: विरुद्ध न्यूझीलंड, रांची (२०२१)
गायकवाड-किशन: वि दक्षिण आफ्रिका, विजाग(२०२२)*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘यामुळे कार्तिकला टी२० विश्वचषकाच्या संघात घेणार नाही’, भारताच्या माजी दिग्गजाने वर्तवले भाकित
उत्तर प्रदेशविरुद्ध उपांत्य सामन्यात जयस्वालची ‘यशस्वी’ खेळी, मुंबईसाठी ठोकले शतक
जितकी चर्चा झाली, खरंच तितका वाद धोनी आणि सेहवागमध्ये होता का?