इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी संघांमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघांची गणना होते. मुंबईने आतापर्यंत 5 वेळा, तर चेन्नईने 4 वेळा आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. अशात हे दोन्ही संघ आयपीएल 2023 स्पर्धेच्या 12व्या सामन्यात शनिवारी (दि. 8 एप्रिल) भिडणार आहेत. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघातील काही खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असणार आहेत. चला तर यापैकी 5 अव्वल खेळाडूंविषयी जाणून घेऊयात…
1. ऋतुराज गायकवाड
चेन्नई सुपर किंग्स संघाचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने आतापर्यंत स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 2 सामन्यात दोन्ही वेळा 50 धावांचा आकडा पार केला आहे. त्याने पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाविरुद्ध 92 धावांची खेळी केली होती. तसेच, लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्धच्या सामन्यात 57 धावांची खेळी साकारली होती. आता मुंबईविरुद्धच्या सामन्यात त्याच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल.
2. सूर्यकुमार यादव
यादीत दुसऱ्या स्थानी मुंबई इंडियन्स संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आहे. त्याने पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध 15 धावांचीच खेळी केली होती. त्यामुळे आता चेन्नईविरुद्धच्या सामन्यात त्याच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल.
3. बेन स्टोक्स
चेन्नईचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) याच्या कामगिरीवरही सर्वांचे लक्ष असेल. चेन्नईने त्याला आयपीएल 2023साठी 16.25 कोटी रुपयांमध्ये ताफ्यात सामील केले आहे. स्टोक्सने आतापर्यंतच्या दोन सामन्यात खास कामगिरी केली नाहीये. गुजरातविरुद्ध त्याने 7 धावा, तर लखनऊविरुद्ध 8 धावा केल्या होत्या. याव्यतिरिक्त गोलंदाजीत त्याने 1 षटकात 18 धावा खर्च केल्या होत्या.
Ready for the epic clash in the ring!#MIvCSK #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/w2QmUeXG2m
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 8, 2023
4. एमएस धोनी
या यादीत चौथ्या स्थानी चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आहे. धोनीने लखनऊविरुद्धच्या सामन्यात सलग दोन षटकार माून मैफील लुटली होती. अशात मुंबईविरुद्धच्या सामन्यातही तो अशीच काही कामगिरी करतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
5. रोहित शर्मा
चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या खेळीवरही सर्वांचे लक्ष असेल. कारण, रोहितने बेंगलोरविरुद्धच्या पहिल्या सामन्यात फक्त 1 धाव केली होती. अशात चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. (ruturaj gaikwad to ben stokes this 5 players to be watch out in mi vs csk ipl 2023 12th match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! कृणाल पंड्याचे लाईव्ह सामन्यात अश्लील कृत्य, अंपायरच्या प्रायव्हेट पार्टला…
नवख्या जयसवालचा गुवाहाटीत धमाका! पहिल्याच ओव्हरमध्ये केली ‘अशी’ कामगिरी, थेट गेल-वॉर्नरच्या यादीत नाव