भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सध्या ३ सामन्यांची टी२० मालिका (3 Matches T20 Series) सुरू आहे. भारतीय संघाने लखनऊ येथे झालेला पहिला टी२० सामना ६२ धावांनी जिंकला असून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. यानंतर आता २६ फेब्रुवारी रोजी धरमशाला येथे उभय संघातील दुसरा टी२० सामना (Second T20I) रंगणार आहे. हा सामना जिंकत मालिकाही खिशात घालण्याकडे भारतीय संघाचे लक्ष असेल. तर पाहुणा श्रीलंकेचा संघ हा सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील असेल. अशात या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये (Changes In Playing XI) काही बदल पाहायला मिळू शकतात.
पहिल्या टी२० सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ६ बदल करण्यात आले होते. या सामन्यात इशान किशनसोबत (Ishan Kishan) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने सलामी दिली होती. त्यांचा हा प्रयोग यशस्वीही ठरला होता. या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १११ धावांची शतकी भागीदारी साकारली होती. परंतु येत्या सामन्यात ही सलामी जोडी (Change In Opening Pair) बदलू शकते.
हेही वाचा- ऋतुराजला मैदानावर पाहण्यास आतुर चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, दुखण्याने बेजार खेळाडू
इशानने पहिल्या टी२० सामन्यात धमाकेदार खेळी करत सलामीसाठी आपला दावा ठोकला आहे. त्याने या सामन्यात सलामीला फलंदाजी करताना ५६ चेंडूंमध्ये ३ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने ८९ धावा जोडल्या होत्या. त्याच याच अप्रतिम खेळीचे बक्षिस त्याला दुसऱ्या सामन्यातही मिळू शकते. तो श्रीलंकेविरुद्ध धर्मशाळा येथील दुसऱ्या टी२० सामन्यात सलामीला फलंदाजीसाठी येऊ शकतो. मात्र यावेळी त्याचा सलामी जोडीदार रोहित नसून तो युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) असेल.
ऋतुराजला मनगटाची दुखापत झाली नसती, तर त्याने पहिल्या टी२० सामन्यात सलामीला उतरणे जवळपास निश्चित होते. परंतु दुखापतीमुळे तो या सामन्यात खेळू शकला नव्हता. मात्र आता दुसऱ्या टी२० सामन्यात तो फिट होऊन संघात पुनरागमन करू शकतो. त्यामुळे रोहितऐवजी ऋतुराज सलामीला फलंदाजी (Ruturaj Gaikwad To Open In Second T20I) करू शकतो. अशावेळी रोहितला मधल्या फळीत फलंदाजीला जावे लागेल.
भारताचा टी२० संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, इशान किशन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज पटेल, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.
श्रीलंकेचा टी२० संघ: पाथुम निसांका, कुसल मेंडिस, दासुन शानाका (कर्णधार), धनुष्का गुणाथिलिके, जेनिथ लिआंगे, चारिथ अस्लांका, दिनेश चंडीमल, कामिल मिश्रा, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमिरा, लाहिरू कुमारा, बिनुरा फेरानांद, माऊर, शिनाका, बिनूरा, जेनिथ फेरोन वेंडरसे, प्रवीण जयविक्रम, एशियन डॅनियल्स.
महत्त्वाच्या बातम्या-
जडेजाला फलंदाजीसाठी चौथ्या क्रमांकावर खेळवण्याबाबत कर्णधार रोहितचे मोठे संकेत, म्हणाला…
क्रीडा मंत्री रणजीच्या मैदानात होतोय सपशेल फेल, पहिल्या सामन्यात झिरो; तर आता २ धावांवर तंबूत
Ranji Trophy 2022: ६१ धावांवर संपुष्टात आला ‘या’ संघाचा डाव, ५ खेळाडू भोपळाही न फोडता परतले तंबूत