देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफी 2022-2023 चा अंतिम सामना शुक्रवारी (2 डिसेंबर) खेळला गेला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सौराष्ट्र संघाने महाराष्ट्राचा पाच गडी राखून पराभव करत विजेतेपद आपल्या नावे केले. महाराष्ट्र संघाला अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला असला तरी, महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड हा स्पर्धेचा मानकरी ठरला. त्याचवेळी त्याने या स्पर्धेत अशी काही तुफानी फलंदाजी केली की, त्याची तुलना थेट सर्वकालीन महान क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन यांच्याशी केली जात आहे.
ऋतुराज गायकवाड हा साखळी फेरीतील केवळ दोन सामने खेळू शकला होता. त्यातही त्याने एक शतक झळकावले होते. मात्र, त्यानंतर बाद फेरीच्या सामन्यांमध्ये त्याची बॅट चांगलीच बोलली. उपांत्यपूर्व सामन्यात त्याने 220, उपांत्य सामन्यात 168 तर अंतिम सामन्यातही 108 धावांची खेळी केली. त्याने संपूर्ण स्पर्धेत 5 सामने खेळताना चार शतकांच्या मदतीने तसेच 220 च्या सरासरीने 660 धावा केल्या. या कामगिरीसाठी त्याला स्पर्धेचा मानकरी म्हणून घोषित केले गेले.
विजय हजारे ट्रॉफीच्या मागील दोन हंगामांचा विचार केल्यास ऋतुराजने अक्षरशा वर्चस्व गाजवलेले दिसत आहे. त्याने या दोन हंगामात 10 सामने खेळताना आठ सामन्यात शतके साजरी केली आहेत. 1263 धावा करताना त्याची सरासरी 180.42 अशी राहिली. तसेच, त्याची लिस्ट ए क्रिकेटमधील सरासरी 61.12 इतकी जबरदस्त असून, जी क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम आहे. या सरासरीमुळेच त्याची तुलना थेट डॉन ब्रॅडमन यांच्याशी होताना दिसत आहे. ब्रॅडमन हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होताना त्यांची सरासरी 99.96 अशी होती. 80 वर्षानंतरही अद्याप कोणीही त्यांच्या या सरासरीच्या आसपास जाऊ शकले नाही.
(Ruturaj Gaikwad Unreal Stats In Vijay Hazare Trophy And List A Cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023च्या हंगामासाठी नवा नियम, सामन्यात एका संघाचे 11 नाहीतर 15 खेळाडू होणार सहभागी
नेमका तो गोल होता की नाही? जपानच्या ‘त्या’ वादग्रस्त गोलमुळे जर्मनी स्पर्धेबाहेर