इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याची युएईमध्ये सुरुवात धमाकेदार झाली. रविवारी (१९ सप्टेंबर) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याने या टप्प्याला सुरुवात झाली. हा सामना चेन्नईने २० धावांनी जिंकला. चेन्नईच्या या विजयात पुण्याच्या २४ वर्षीय उजव्या हाताचा फलंदाज ऋतुराज गायकवाडने महत्त्वाचा वाटा उचलला.
ऋतुराज गायकवाडने चेन्नई सुपर किंग्जकडून अतिशय बिकट परिस्थितीत खेळतांना संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवले. त्याने ५८ चेंडूत नाबाद ८८ धावा केल्यामुळे सीएसकेचा संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध १५६ धावा करू शकला. ऋतुराजने युएआमध्ये सलग चौथे अर्धशतक केले आहे. असा पराक्रम करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
वासिम जाफरने ट्विट करत म्हटले आहे की ‘चेन्नईमध्ये गायकवाड नावाची लोकं चांगली कामगिरी करतात यात काहीच शंका नाही’. यावेळी त्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते रजनीकांत यांचा फोटोही शेअर केला आहे. रजनीकांत यांचेही अडनाव गायकवाड आहे. तसेच हरभजन सिंग, के श्रीकांत, आरपी सिंग असे अनेक क्रिकेटपटूंनीही त्याचे कौतुक केले आहे.
Not surprised to see someone named Gaikwad doing well in Chennai😉 #CSKvsMI #IPL2021 pic.twitter.com/uqtv7pUZJK
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) September 19, 2021
A shot like this against Bumrah! #Ruturaj Gaikwad may jave just played the shot of the #IPL2O21 . pic.twitter.com/4MEQ6zZ3P0
— R P Singh रुद्र प्रताप सिंह (@rpsingh) September 19, 2021
From 7/3 to 156/6, What a fightback!
Outstanding from @Ruutu1331,the maturity on show to construct an innings was commendable. This is going to be a cracker of a contest!#VIVOIPL #IPL2O21 #CSKvsMI #Cricket #CSK #MI
— Abhinav Mukund (@mukundabhinav) September 19, 2021
Well played #Rituraj super Inn machaa @ChennaiIPL vs @mipaltan @IPL
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) September 19, 2021
What a come back by @ChennaiIPL from 20/5 to 150 odd, thought the match was over but now it's an even contest all thanks to #Ruthiraj , what a brilliant knock, all his shots looked exquisite,he gives the boys in yellow a fighting chance! #CSKvsMI #IPL2021
— Kris Srikkanth (@KrisSrikkanth) September 19, 2021
Csk fans to Ruturaj Gaikwad RN! pic.twitter.com/DD94JjCtBE
— theindustryman (@theindustryman1) September 19, 2021
Man of Match Ruturaj Gaikwad 💥 #CSKvsMI pic.twitter.com/iOBCJ78PD2
— Prabhakar (@itz_Prabhaa) September 19, 2021
6 50s in winning cause
5 man of the match award
Hitting Worldclass bowlers like bumrah,pat cummins,rashid Khan for Fun
Ruturaj Gaikwad 🦁🦁 CSK varasudu pic.twitter.com/gBrv3bf1b8
— ☬ADITHYA☬ (@AdityaMb_4005) September 19, 2021
If you hit #Bumrah like that you are seeing the ball really really well ! Well played #Ruturajgaikwad ! #MIvCSK
— Vikram Sathaye (@vikramsathaye) September 19, 2021
CSK loosing wkts continuously.
Le Ruturaj Gaikwad : pic.twitter.com/AlJuY9QXhe
— Anant (@_Aawarahun) September 19, 2021
Journey of Ruturaj Gaikwad pic.twitter.com/rrQdBOy3zm
— IPL FEVER ON🏏 (@iamsohail__1) September 19, 2021
https://twitter.com/ViratkohliFabb/status/1439607528015286278
#MIvsCSK #CSKvsMI
Ruturaj Gaikwad In today's match : pic.twitter.com/YCpk7vDtTN— Prathamesh (@Memesrestic) September 19, 2021
https://twitter.com/Theavanishsingh/status/1439617650288594948
Csk fan to Ruturaj Gaikwad: pic.twitter.com/XIXkumGC63
— Sneha (@Sneha27931) September 19, 2021
या सामन्यात सीएसकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय चांगलाच अंगलट आला. त्यांचा सलामीवीर फाफ डू प्लेसीस पहिल्याच षटकात तंबूत परतला. त्याला ट्रेंट बोल्टने बाद केले. त्यानंतर पुढच्याच षटकात मोईन अलीही शून्यावर बाद झाला. त्याला मिल्नेने सौरभ तिवारी करवी झेलबाद केले. याच षटकात अंबाती रायडू जखमी होऊन माघारी परतला.
चेन्नईचे तीन गडी संघाच्या दोन धावा झाल्या असतांनाच तंबूत परतले होते. पण खेळपट्टीवर एका बाजूने ऋतुराज गायकवाड उभा होता. त्याने सुरुवातीला संयमी खेळी केली, नंतर त्याने रविंद्र जडेजा आणि ड्वेन ब्रावो सोबत छोटेखानी भागीदारी रचल्या. जडेजाने २६ धावा केल्या, तर ब्रावोने २३ धावा करत ऋतुराजला मोलाची साथ दिली.
किंतु धोनी आणि रैना यांनी पुन्हा निराशा करत खराब प्रदर्शन केले. धोनीने तीन धावा केल्या तर रैनाने चार धावा केल्या. ऋतुराजने ८८ धावांची नाबाद खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने नऊ चौकार आणि चार षटकार लगावले. त्याच्या खेळीमुळे संघाने १५० धावांचा टप्पा ओलांडला. ऋतुराजमुळे चेन्नई संघाने मुंबई संघापुढे १५६ धावांचे आव्हान ठेवले आहे.
नंतर १५७ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबई संघाने नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या. दरम्यान, एक बाजू सौरभ तिवारीने सांभाळली होती. त्याने नाबाद ५० धावा केल्या. मात्र, त्याला दुसऱ्या बाजूने भक्कम साथ मिळाली नाही. त्यामुळे मुंबईचा डाव २० षटकांत ८ बाद १३६ धावांवर संपला आणि चेन्नईने २० धावांनी विजय मिळवला. चेन्नईकडून ड्वेन ब्रावोने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर दीपक चाहरने २ विकेट्स घेतल्या. तसेच शार्दुल ठाकूर आणि जोश हेजलवूडने प्रत्येकी १ विकेट घेतली.ट
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबईविरुद्ध सामना जिंकला, पण चेन्नईला मोठा धक्का, रायडू फलंदाजी करताना झाला जखमी, पाहा व्हिडिओ
“गिल आणि राणा भारताची पुढची पिढी, ते कदाचित येत्या दशकात आपली छाप सोडू शकतात”
धावबाद झालेल्या फलंदाजाने दुसऱ्या फलंदाजाच्या अंगावर फेकली बॅट, पाहा गमतीदार व्हिडिओ