इंग्लंडमध्ये सध्या कौंटी क्रिकेट सुरु आहे. या स्पर्धेत रेयान पटेल या गोलंदाजाने 5 धावा देत तब्बल 6 विकेट घेण्याची मोठी कामगिरी करुन सर्वांचे लक्ष वेधले आहे.
त्याने सरे विरुद्ध सोमरसेट यांच्यात 20 ते 22 जून दरम्यान पार पडलेल्या सामन्यात सरे संघाकडून खेळताना ही कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर सरेने या सामन्यात 1 डाव आणि 69 धावांनी सहज विजय मिळवला.
सरेने पहिल्या डावात फलंदाजी करताना 459 धावांचा डोंगर उभा केला होता. विशेष म्हणजे फलंदाजी करतानाही रेयानने फलंदाजीतील त्याचे कौशल्य दाखवत 48 धावांची छोटेखानी खेळी केली होती.
त्यातही विशेष म्हणजे तो डाव्या हाताने फलंदाजी करतो तर उजव्या हाताने गोलंदाजी करतो.
रेयान हा चांगला फलंदाज असुन चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. त्याने 8 प्रथम श्रेणी सामन्यात खेळताना 30 च्या सरासरीने 300 धावा केल्या आहेत. तसेच तो गरज लागेल तेव्हा मध्यम गतीने गोलंदाजीही करतो.
या सामन्यातही त्याने गोलंदाजी करताना कमाल केली. त्याने फक्त 11 चेंडूतच 5 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या. यामुळे सोमरसेटचा पहिला डाव 180 धावांवरच संपुष्टात आला. यामुळे सरेने त्यांना फॉलोआॅन दिला.
1⃣1⃣ balls
5⃣ wicketsAn incredible flurry of wickets for Ryan Patel! 🔥 #SURvSOM pic.twitter.com/FTS1U2i6L0
— Surrey Cricket (@surreycricket) June 21, 2018
या कामगिरी बद्दल रेयान म्हणाला, पहिल्याच चेंडूवर विकेट घेतल्याने माझा आत्मविश्वास वाढला होता. पण मी कधीही मला 6 विकेट मिळतील असा विचार केला नव्हता.
दुसऱ्या डावातही सोमनसेटच्या फलंदाजांना खास काही करता न आल्याने त्यांचा दुसरा डावही 210 धावांवर संपुष्टात आला. दुसऱ्या डावात मात्र रेयानला विकेट घेता आली नाही. पण त्याने फलंदाजांना धावा घेण्यापासून रोखले होते. त्याने दुसऱ्या डावात 4 षटकात फक्त 7 च धावा दिल्या.
महत्त्वाच्या बातम्या:
–५ वर्षांपुर्वी याच दिवशी धोनी बनला होता जगातील सर्वात परिपुर्ण कर्णधार!
–माजी कर्णधार अनिल कुंबळे सुरु करतोय नवी इनिंग!