दिल्ली। भारतीय संघ आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यासाठी आज, 23 जूनला दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन रवाना झाला आहे.
याचे फोटो कर्णधार विराट कोहली, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, कुलदिप यादव या खेळाडूंनी आणि बीसीसीआयनेही सोशल मिडियावर शेअर केले आहेत.
Off we go. UK Bound! ????????@msdhoni @SDhawan25 Arun Kanade pic.twitter.com/WnJvRkHYFs
— Virat Kohli (@imVkohli) June 23, 2018
And we are off! ✈ pic.twitter.com/IvBVZbD95K
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) June 23, 2018
भारतीय संघ या 3 महिन्यांच्या दौऱ्यात आयर्लंड विरुद्ध जूनच्या शेवटच्या आठवड्यात अनुक्रमे 27 आणि 28 जूनला दोन टी20 सामने खेळणार आहे.
यानंतर पुढील महिन्यात 3 जुलै पासुन इंग्लंड विरुद्ध सामने सुरु होणार आहेत. इंग्लंड विरुद्ध भारतीय संघ 3 टी20, 3 वनडे आणि 5 कसोटी सामने खेळणार आहे.
Time to begin the journey towards our next destination! Enroute England @ImRo45 @yuzi_chahal #TeamIndia???????? #squadgoals pic.twitter.com/kPeSVqVZNb
— Kuldeep yadav (@imkuldeep18) June 23, 2018
पुढीलवर्षी होणाऱ्या विश्वचषकाचे यजमानपद इंग्लंडकडे असल्याने हा दौरा त्या दृष्टीने भारतासाठी महत्त्वाचा आहे.
या दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी भारतीय संघाची आधीच निवड असली तरी अजून कसोटी मालिकेसाठी खेळाडूंची निवड झालेली नाही.
https://twitter.com/BCCI/status/1010397995609853952
मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी भारतीय संघात वॉशिंगटन सुंदर, सिद्धार्थ कौल या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
तसेच जवळजवळ तीन वर्षांनंतर सुरेश रैनाने भारताच्या वनडे संघात पुनरागमन केले आहे. अंबाती रायडू फिटनेस टेस्टमध्ये अयशस्वी झाल्याने रैनाला त्याच्या ऐवजी संधी देण्यात आली आहे.
असा आहे भारताचा टी 20 संघ:
विराट कोहली(कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, एमएस धोनी, हर्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वाशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बूमराह, सिद्धार्थ कौल, उमेश यादव
असा आहे भारताचा वनडे संघ:
विराट कोहली(कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, एमएस धोनी, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बूमराह, हर्दिक पंड्या, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार, सुरेश रैना, उमेश यादव
असा असेल भारताचा आयर्लंड-इंग्लंड दौरा
आयर्लंड दौरा-
27 जून- पहिला टी-20 सामना
29 जून दुसरा टी-20 सामना
इंग्लंड दौरा-
टी-20 मालिका:
3 जुलै- पहिला टी-20 सामना
6 जुलै- दुसरा टी-20 सामना
8 जुलै- तीसरा टी-20 सामना
वनडे मालिका:
12 जुलै- पहिला वनडे सामना
14 जुलै- दुसरा वनडे सामना
17 जुलै- तीसरा वनडे सामना
कसोटी मालिका:
1 ऑगस्ट- पहिला कसोटी सामना
9 ऑगस्ट- दुसरा कसोटी सामना
18 ऑगस्ट- तीसरा कसोटी सामना
30 ऑगस्ट- चौथा कसोटी सामना
7 सप्टेंबर- पाचवा कसोटी सामना
महत्त्वाच्या बातम्या:
–कबड्डीवरुन सेहवाग आणि पाकिस्तानी चाहत्यांचे ट्विटरवर घमासान!
–भारताचा माजी कर्णधार म्हणतो इंग्लंडमध्ये चालणार फिरकीची जादू
–त्या खेळाडूने वनडेत केलीत ११ शतके परंतु कसोटीत एक सामनाही नशिबात नाही!





