सध्या ओमान व संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) टी२० विश्वचषक स्पर्धा खेळली जात आहे. पात्रता फेरीतील सामने पार पडल्यानंतर मुख्य स्पर्धेला २३ ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. मात्र, पात्रता फेरीत खेळलेला नेदरलँड्सचा दिग्गज फलंदाज रेयान टेन डोश्चे याने स्पर्धेच्या दरम्यानच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. नेदरलँड्स क्रिकेटच्या अधिकृत संकेतस्थळावरून याबाबतची माहिती देण्यात आली.
नेदरलँड्स क्रिकेटकडून पुष्टी
टी२० विश्वचषकाच्या पात्रता फेरीत नेदरलँड्सला आयर्लंड व नामिबियाकडून पराभूत व्हावे लागले. त्यानंतर संघ विश्वचषकातून बाहेर पडलेला. श्रीलंकेविरुद्धचा अखेरचा साखळी सामना तो खेळला नाही. या सामन्यातही श्रीलंकेकडून नेदरलँड्सला पराभूत व्हावे लागले. या सामन्यात डोश्चे मैदानात उतरला नव्हता. नेदरलँड्स क्रिकेटने जाहीर केल्यानुसार,
‘हा दौरा कठीण होता. मात्र, संघाचा भाग होऊन आनंद झाला. या संघाची व्यवसायिकता व्यावसायिकता प्रतिबद्धता राहिली आहे. मी खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रिकेट बोर्डाचा आभारी आहे.’
श्रीलंकेविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात नेदरलँड्स संघ अवघ्या ४४ धावांमध्ये गारद झाला होता.
अशी राहिली आहे कारकीर्द
नेदरलँड्सच्या इतिहासातील सर्वात दिग्गज खेळाडू म्हणून रेयान टेन डोश्चेला ओळखले जाते. त्याने आपल्या कारकीर्दीची सुरुवात २००६ मध्ये श्रीलंकेविरुद्ध केली होती. त्याने आपल्या कारकीर्दीत ३३ वनडे सामन्यात १५४१ धावा व टी२० कारकिर्दीत २४ सामन्यात ५३३ धावा काढल्या होत्या. २०११ विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध ११९ व आयर्लंडविरुद्ध १०६ धावा केलेल्या.
त्याने आयपीएलमध्ये २०११ ते २०१५ या काळात कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व केले होते. कोलकाताने जिंकलेल्या २०१२ व २०१४ आयपीएल विजेतेपदांमध्ये त्याची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्याने आपल्या आयपीएल कारकीर्दीत २९ सामन्यात २३.२८ च्या सरासरीने ३२६ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-





