आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात पारंपारिक विरोधी म्हणून भारत आणि पाकिस्तानकडे पाहिले जाते. उभय संघांमध्ये सर्व सामने हे अटीतटीचे तसेच अत्यंत निकराचे झालेले पाहायला मिळतात. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत दोन्ही देशांचे क्रिकेटप्रेमी देखील या सामन्यासाठी खूप उत्साही असलेले दिसून येतात. युएई येथे होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी सर्व देशातील चाहते तयार झाले असून, भारत आणि पाकिस्तान या सामन्यासाठी वातावरणनिर्मिती सुरू आहे. त्याचवेळी भारतीय कर्णधार विराट कोहली याने केलेल्या एका ट्विटमुळे दोन्ही देशांच्या चाहत्यांनी त्याला धारेवर धरले आहे.
काय केले ट्विट
विराट कोहली याने नुकतेच आपला ब्रँड WRONG साठी फोटोशूट केले. त्याने त्यावेळचे छायाचित्र ट्विटरवर पोस्ट केले. ज्याला कॅप्शन देताना त्याने लिहिले, लोक विचारतात रविवारी होणाऱ्या मोठ्या सामन्यापूर्वी तुम्ही चिंताग्रस्त आहात, बरोबर? त्यावर कोहलीने त्याला आपल्या ब्रँडचे नाव WRONG हे दाखविले. यानंतर मात्र चाहत्यांनी त्याला चांगलेच फैलावर घेतले.
https://twitter.com/imVkohli/status/1451073181251375112?t=EHQSZ66q7Ndb9MAiijBVjw&s=19
एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले,
‘भाई चुकून जर २४ तारखेला हरला तर विचार कर’
https://twitter.com/theprayagtiwari/status/1451074861485346818?t=ITxPf0tap7LYgtXV9o4q_Q&s=19
अन्य एका चाहत्याने ट्विट करत लिहिले,
‘सर, तुमचा मार्केटिंगचा वेगळाच वर्ल्डकप सुरू आहे’
https://twitter.com/india_fantasy/status/1451074665888243722?t=8VPu9_rwltfGxcxQuL_I4g&s=19
आणखी एका ट्विटर वापरकर्त्यांने मीम शेअर करत,
‘हारना नहीं बेटा जी’
https://twitter.com/rising_symbol/status/1451091593511903235?t=zwSb_Q-hktw9U3HUzRyrjQ&s=19
विश्वचषकात भारत सरस
भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान टी२० विश्वचषकात पाच सामने झाले असून ते सर्व सामने भारताने जिंकले आहेत. २४ ऑक्टोबर रोजी होणारा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना जिंकून भारत विजय सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघ विश्वचषक इतिहासात प्रथमच भारतीय संघाला मात देण्याच्या प्रयत्न असेल. भारताच्या गटात न्यूझीलंड व अफगाणिस्तान यांचा समावेश असून, पात्रता फेरीतील आणखी दोन संघ गटात सहभागी होतील.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-पाकिस्तान सामना तोंडावर असताना बीसीसीआयचा ‘मोठा’ निर्णय, अय्यरसहित ४ खेळाडूंना पाठवले मायदेशी






