---Advertisement---

भारताचे आणखी एक पदक पक्के! महिला लॉन बॉल संघाने न्यूझीलंडचा पराभव करत रचला इतिहास

Indian Women Lawn Bowl Team
---Advertisement---

बर्मिंघम, इंग्लंड येथे २२वी कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games)सुरू आहे. रविवारचा (३१ जुलै) भारताच्या वेटलिफ्टिंर्सनी दिवस गाजवला. आता भारताचे आणखी एक पदक निश्चित झाले आहे. भारताच्या महिला लॉन बॉल संघाने इतिहास रचला आहे. त्यांनी उपांत्य फेरीत न्यूझीलंडला १६-१३ असे पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर अंतिम फेरीत भारत दक्षिण आफ्रिकेशी मंगळवारी (२ ऑगस्ट) सामना करणार आहे.

भारताच्या या संघात लवली चौबे, पिंकी, नयनमोकी सायकिया आणि रूपा रानी टिर्की यांचा समावेश आहे. शेवटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात दोन्ही संघात चांगलीच टक्कर पाहायला मिळाली आहे. भारत या सामन्यात सुरूवातील ६-१ असा मागे होता, मात्र धमाकेदार पुनरागमन करत संघाने पदक पक्के केले आहे.

भारताने आतापर्यंत या स्पर्धेत ६ पदके जिंकली आहेत. तर हे भारताचे ७वे पदक असणार आहे. मात्र ते रौप्य की सुवर्ण हे २ ऑगस्टला कळणार आहे. सध्या भारताने ३ सुवर्ण, जे मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा आणि अचिंत शिवली यांनी जिंकली आहेत. तर संकेत सरगर आणि बिंदीयारानी देवी यांनी रौप्य पदक जिंकले आहेत. तसेच गुरूराज पुजारीने कांस्य पदकावर आपले नाव कोरले आहे.

भारतीय महिला लॉन बॉल संघाने उपांतपूर्व फेरीत आयर्लंडचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. तर प्रथमच भारताने या खेळाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर यामध्ये मिळणारे पदकही ऐतिहासिक ठरणार आहे. याआधी भारताने लॉन बॉलमध्ये एकदाही पदक जिंकलेले नाही.

अजय सिंगचे थोडक्यात हुकले पदक

स्पर्धेच्या चौथ्या दिवशी एकीकडे भारताच्या लॉन बॉल संघाने आनंदाची बातमी दिली, तर दुसरीकडे वेटलिफ्टर अजय सिंगची निराशा झाली आहे. त्याने स्नॅच प्रकारामध्ये सर्वाधिक १४३ किलो वजन उचलले होते. यामुळे तो तिसऱ्या स्थानावर राहिला. नंतर क्लिन एंड जर्कमध्ये पहिले १७२ किलो वजन उचलले आणि दुसऱ्या प्रयत्नात १७६ किलो वजन उचलण्याचा यशस्वी प्रयत्न केला. मात्र तिसऱ्या प्रयत्नात १८० किलो वजन उचलण्यात तो अपयशी  ठरला.

यामुळे अजय एकूण ३१९ किलो वजनासह चौथ्या स्थानावर राहिला. तर तिसऱ्या स्थानावरील खेळाडूने अजयपेक्षा एक किलो वजन अधिक उचलले होते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

रोहित शर्मा इतिहास घडवणार! ‘ही’ कामगिरी केली तर मोडू शकतो पाकिस्तानी दिग्गजाचा विक्रम

वेटलिफ्टिंगनंतर आता बॉक्सिंगमध्ये भारताचं नाणं खणकणार, वाचा काय आहेत संधी

हरमनप्रीतने चालवली टीम इंडियाची परंपरा, भारत-पाकिस्तान सामन्यानंतर केले ‘हे’ हृद्य जिंकणारे कृत्य

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---