---Advertisement---

नीरज चोप्राची फायनलमध्ये धमाकेदार एँन्ट्री, पहिल्याच प्रयत्नात केला भीमपराक्रम!

---Advertisement---

भारताचा गोल्डन बाॅय नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी केला आहे. आज (06 ऑगस्ट) पॅरिस ऑलिम्पिकमधील होत असलेल्या भालाफेक पात्रता फेरीच्या स्पर्धेत नीरज चोप्राने 89.34 मीटर लांब भालाफेक करुन अंतिम फेरासाठी पहिल्या प्रयत्नात यशस्वी ठरला आहे. खरं तर, अंतिम फेरीसाठी पात्र होण्यासाठी, 84 मीटरचे गुण निश्चित केले होते. नीरजशिवाय पाकिस्तानच्या अर्शद नदीमनेही 86.59 मीटर भालाफेक करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

भारताचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राने मंगळवारी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मंगळवारी (06 ऑगस्ट) ‘ब’ गटातील पात्रता फेरीत चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीटर अंतर नोंदवले आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. नंतर, पाकिस्तानचा अर्शद नदीम, ज्याने 2022 मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये 90 मीटरचा टप्पा ओलांडला होता, तो देखील चोप्राशी अंतिम फेरीत सामील झाला कारण त्याने त्याच्या पहिल्याच प्रयत्नात पात्रता मानक अंतर देखील पार केले. नदीमने 86.59 मीटर अंतर नोंदवले.

तथापि, भारताच्या किशोर जेनाचे हार्ट ब्रेक झाले, त्याने आपल्या पहिल्या ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत प्रवेश करू शकला नाही. त्याने ‘अ’ गटात 80.73 मीटर लांब भालाफेकत नवव्या स्थानी राहिला.

हेही वाचा-

Paris Olympic 2024: कुस्तीपटू विनेश फोगाटची क्वार्टरफायनलमध्ये थाटात एँट्री…!!!
‘2027 विश्वचषकानंतरचा कर्णधार…’, माजी भारतीय प्रशिक्षकाने शुबमन गिलबद्दल केली मोठी भविष्यवाणी
T20 World Cup: सत्तापालटानंतर बांग्लादेशवर टांगती तलवार, टी20 विश्वचषकाचे यजमानपद धोक्यात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---