मुंबई । आयपीएलमध्ये 2013 साली भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सापडला होता. श्रीसंत समवेत अजित चंडेला आणि अंकित चव्हाण यांना देखील दिल्ली पोलिसांनी या प्रकरणामध्ये पकडले होते. स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी असल्यामुळे तिघांनाही काही काळ जेलमध्ये राहावे लागले. त्यानंतर बीसीसीआयने या तिघांवर कडक कारवाई करत आजीवन क्रिकेट खेळण्याची बंदी घातली.
पण मागीलवर्षी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयने श्रीसंतवर घालण्यात आलेले आजीवन प्रतिबंध हटविले आहे. काही महिन्यांपूर्वी बीसीसीआयचे लोकपाल निवृत्त न्यायाधीश डी.के. जैन यांनी सांगितले होते की,”12 सप्टेंबर 2020 दिवशी श्रीसंतवरील सात वर्षांची बंदी समाप्त होणार आहे.”
त्यामुळे तो पुन्हा क्रिकेट खेळू शकतो. चेन्नई येथील तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ डिव्हिजन लीग मधून तो क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास इच्छुक आहे. यापूर्वीही तो या स्पर्धेत खेळला होता. तो ग्लोब ट्रॉटर्सकडून खेळला होता.
एस श्रीसंत न्यू इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाला की, “चेन्नईमधील माझ्या काही आठवणी आहेत. मी डेनिस लिली आणि टी.ए. शेखर यांच्याकडून वेगवान गोलंदाजीचे धडे घेतले आहेत. एमए चिदंबरम स्टेडियमवर क्रिकेट खेळतानाच्या अनेक आठवणी आहेत. येथील खेळपट्टी फलंदाजीस अनुकूल आहे. गोलंदाजी करणे नेहमीच आव्हानात्मक काम आहे. तसेच टीएनसीए या लीगमध्ये खेळण्यास देखील मला आवडते.”
“मी पहिल्यासारखी गोलंदाजी करत आहे आणि हळूहळू आपल्या लयीत येत आहे. गोलंदाजी करताना मला विलक्षण आनंद होत आहे. प्रथम श्रेणीमधील क्रिकेटपटूसारखी कामगिरी मला करायची आहे. मी क्रिकेट खेळण्यास इच्छुक आहे. भले ती ग्लोब ट्रॉटर्स टीम असो अथवा इतर कोणताही संघ. ज्या संघाकडून खेळेन तिथे सर्वोत्तम प्रदर्शन करील”, असे श्रीसंतने सांगितले.
ट्रेंडिंग घडामोडी –
माहीचा बड्डे! कॅप्टन कूल धोनीचा बड्डे पोस्टर झालाय रीलिझ, पहा…
युवा खेळाडूंचे करियर व्हावे म्हणून सुशांत सिंग रजपूत फाऊंडेशन काय केले पहाच
सचिनची विकेट घेणं ‘या’ दोन गोलंदाजांसाठी ठरलं होतं वरदान, थेट टीम इंडियात मिळाली होती जागा