नवी दिल्ली । भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूप सक्रिय दिसत आहे. २००७ च्या टी२० विश्वचषकातील आपल्या कामगिरीला उजाळा देत त्याने काही माध्यमांशी इंस्टाग्रामवर लाईव्हद्वारे चर्चा केली होती. त्याने आपला सार्वकालीन सर्वश्रेष्ठ वनडे संघ निवडला होता.
त्यानंतर आता त्याने इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या ४ संघांची निवड केली आहे. जगभरातील सर्वात श्रीमंत लीग आयपीएलला २९ मार्चपासून सुरवात होणार होती. परंतु कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थिगत करण्यात आली आहे. जर कोरोना व्हायरसमुळे ती पुढे ढकलली नसती, तर आतापर्यंत ती संपली ही असती.
बीसीसीआयने ही स्पर्धा परत आयोजित करण्यासाठी ‘वाट पहा’ ही नीती अवलंबली आहे. श्रीसंतने एका लाईव्ह चर्चेदरम्यान सांगितले, की २०१९ चा विजयी संघ मुंबई इंडियन्स या सत्रात ही प्लेऑफमध्ये जाईल. पण गंमतीची गोष्ट अशी की हा संघ या हंगामात चांगलं प्रदर्शन करू शकणार नाही. कारण मुंबई इंडियन्स ही सम-विषम वर्षाच्या हिशोबाने प्रदर्शन करत आहे. त्यांनी विषम वर्षातच २०१३, २०१५, २०१७, २०१९ या वर्षीच आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.
२०२० हे एक सम वर्ष आहे. रोहित शर्माने स्वत: या सिद्धांताला खोटं ठरवलं आहे. तो म्हणाला, की प्लेऑफमध्ये मुंबई इंडियन्सवर बोली लावणे स्वभाविक गोष्ट आहे.
श्रीसंतने सांगितले की एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super) संघाने कायम प्लेऑफमध्ये आपली जागा बनवली आहे. श्रीसंतने शेवटचे दोन संघ म्हणून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि सनराइजर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) यांना निवडले आहे.
दोन्ही संघ अप्रतिम आणि मजबूत आहेत. पण विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील आरसीबी अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन करू शकली नाही. मागील तीन हंगामात हा संघ प्लेऑफमध्येही जाऊ शकला नाही. पण २०२० हंगामात ते चांगले प्रदर्शन करतील अशी आशा आहे.
शेवटी श्रीसंतला वाटते की रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि त्याचे सहकारी विजेतेपद कायम राखतील. तसेच ते पाचव्यांदा विजयी होतील.
ट्रेंडिंग घडामोडी-
-फ्लाॅप होईल म्हणून पैशांकडे पाहुन ‘या’ आयपीएल संघाने धोनीला घेतले नाही, आज नाही साधं…
-टीम इंडियासाठी दिवस रात्र घाम गाळणाऱ्या ‘या’ ३ खेळाडूंना विश्वचषकात मिळाली नाही संधी
-‘त्या’ खेळाडूकडे घोडे असल्यामुळे रैना होणार त्याचा क्वारंटाइन पार्टनर