नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ते आता समालोचक आणि प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहेत. लॉकडाऊनच्या काळात ते सोशल मीडियावर खूप सक्रिय असल्याचे दिसत आहे.
एका यूट्यूब चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत इरफान पठाणने (Irfan Pathan) दावा केला आहे, की त्यांना भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) यांच्याकडून आवश्यक पाठिंबा मिळाला नाही.
मुलाखती दरम्यान इरफान म्हणाला, की मी हे नाही सांगू शकत की कर्स्टन किंवा धोनी माझ्या पुनरागमन होण्यास जबाबदार आहेत. पण जेव्हा गोष्टी बदलू लागल्या, तेव्हा या लोकांकडून जेवढा पाठिंबा पाहिजे होता तेवढा मिळाला नाही.
इरफान म्हणाला, “मी कर्स्टन यांना जबाबदार धरत नाही. पण प्रत्येक प्रशिक्षक आणि कर्णधाराचे विचार वेगळे असतात. मला वाटतं वातावरण असे झाले आहे, की माझा चेंडू इतका वळत नव्हता. जर कोणत्या सलामी फलंदाजाला तुम्ही ७ नंबरवर खेळवता, तर त्याच्या फलंदाजीत फरक पडणारच. अशा वेळी कर्णधाराचे काम असते, की त्याला योग्य मार्गदर्शन करणे. कारण कर्णधारानेच त्याचा नंबर बदललेले असतो.”
इरफान पुढे म्हणाला, की जेव्हा मी शेवटचा वनडे सामना खेळला होतो. त्या सामन्यातील चांगल्या प्रदर्शनामुळे मला सामनावीर निवडले गेले होते. पण असे असून मला आंतराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पुनरागमन करण्याची संधी दिली नाही.
“२०१२ मध्ये खेळल्या गेलेल्या या दौऱ्यानंतर न्यूझीलंडविरूद्ध ५ वनडे सामने खेळलो. पण मला एकाही सामन्यात संधी दिली नाही. त्यानंतर मी प्रशिक्षक कर्स्टन यांना विचारले की चांगल्या खेळासाठी मी काय करू, पण त्यावर ते म्हणाले की माझ्या हातात काही नाही,” असे इरफान यावेळी म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-फ्लाॅप होईल म्हणून पैशांकडे पाहुन ‘या’ आयपीएल संघाने धोनीला घेतले नाही, आज नाही साधं…
-तू उद्या सकाळी माझ्या जागी भारतीय संघातून पदार्पण करतोय
-लॉक डाऊनमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ शिलेदाराने गुपचूप उडवला लग्नाचा बार?