वेगवान गोलंदाज एस श्रीसंत (s sreesanth) मागच्या अनेक वर्षांपासून भारतीय संघाच्या बाहेर आहे. आता मोठ्या कालखंडानंतर त्याच्यासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. चाहते लवकरच श्रीसंतला रणजी ट्रॉफीच्या (ranji trophy) आगामी हंगामात खेळताना पाहू शकतात. त्याला केरळच्या संभावित रणजी संघात सामील केले गेले आहे. मागच्या नऊ वर्षांपासून तो लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये खेळला नाही. अशात एवढ्या मोठ्या काळानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी तो स्वतः देखील खूप उत्साही आहे.
केरळच्या रणजी संघात सामील झाल्यानंतर श्रीसंतने एक खास ट्वीटर पोस्ट करून या गोष्टीची माहिती चाहत्यांना दिली. पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘रेल्वेची वाट पाहिल्याप्रमाणे मी या क्षणाची वाट पाहत होतो. या क्षणी मला कसे वाटत आहे, हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. सर्वांचा आभारी आहे. मी माझे सर्वोत्तम प्रदर्शन करू शकेल, यासाठी प्रार्थना करत राहा.’
उल्लेखनीय आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर झाल्यानतंर त्याने तब्बल सात वर्षांनी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. दोन वर्षांपूर्वी तो केरळ संघासाठी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळला होता. कोरोना विषाणूच्या कारणास्तवर रणजी ट्रॉफीचे मागचे दोन हंगाम रद्द करण्यात आले होते. अशात प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी त्याला अधिक वाट पाहावी लागली. त्याव्यतिरिक्त श्रीसंतने २०२१आयपीएलसाठी देखील स्वतःच्या नावाची नोंदणी केली होती. मात्र, लिलावात त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही.
दरम्यान, श्रीसंत भारतीय संघाचा एकेकाळचा महत्वाचा वेगवान गोलंदाज होता. तो भारतासाठी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये खेळायचा. २००७ टी२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातही तो सहभागी होता. टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने पाकिस्तानच्या मिस्बाह उल हकचा झेल पकडून भारताला विजय मिळवून दिला होता. तसेच २०११ विश्वचषक विजेत्या भारतीय संघात देखील तो सहभागी होता. आयपीएलमध्ये खेळताना श्रीसंत मॅच फिक्सिंग प्रकरणात अडकला होता आणि त्यानंतर त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. असे असले तरी, आता त्याच्यावरची बंदी उठवण्यात आली आहे आणि न्यायालयातने आता त्याला सर्व आरोपातून मुक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या –
“रोहित नसतानाही टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौरा फत्ते करेल”
हार्दिक पंड्याची चाहत्यासोबतची वर्तवणूक पाहून नेटकरी ‘गुश्श्यात’, म्हणाले, ‘भाऊ जुणे दिवस विसरला’
SAvsIND, Live: चांगल्या सुरुवातीनंतर विराटचा अतातायीपणा; अर्धशतकापासून राहिला वंचित
व्हिडिओ पाहा –