---Advertisement---

“रोहित नसतानाही टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौरा फत्ते करेल”

On: रविवार, डिसेंबर 26, 2021 7:11 PM
india-in-south-africa
---Advertisement---

भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (south africa tour of india) आहे. २६ डिसेंबरपासून दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेची सुरुवात झाली आहे. दक्षिण अफ्रिका एकमात्र असा देश आहे आहे, जेथे भारताने अजूनपर्यंत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. अशात विराट कोहलीच्या नेतृत्वातील कसोटी संघाकडे या दौऱ्यात इतिहास घडवण्याची संधी आहे. सलामीवीर रोहित शर्मा (rohit sharma) याने दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. अशात माजी वेगवान गोलंदाज झहीर खान (zaheer khan) याने आगामी मालिकेविषयी मत व्यक्त केले आहे. त्याच्या मते, रोहित शर्माची कमतरता भासेल, पण भारत मालिका जिंकू शकतो.

एका वृत्तपत्राशी चर्चा करताना झहीर म्हणाला की, “रोहित शर्माची उणीव तुम्हाला नक्कीच भासेल, यात काहीच शंका नाही. मात्र, जर तुम्ही संघाला पाहिले, तर भारताकडे डावाची सुरुवात करण्यासाठी काही चांगले पर्याय आहेत. तुम्हाला वाट पाहावी लागेल आणि पाहावे लागेल की, संघ कोणत्या दिशेने पुढे जातो. संघात नियमित चांगले प्रदर्शन करणारे खेळाडू आहेत आणि बेंच स्ट्रेंथ देखील खूप चांगली दिसत आहे. संघ व्यवस्थापनासाठी ही एक चांगली डोकेदुखी आहे.”

“संघाच्या नियमित रणनीतीने आणि सतत क्रिकेट खेळण्यामुळे हे शक्य झाले आहे. त्यांना फक्त गोष्टी योग्य ठेवायच्या आहेत. ते जे करत आहेत, ते पुढे कायम ठेवण्याची गरज आहे. ते वेगवेगळ्या परिस्थितीत यशस्वी राहिले आहेत. सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की, गोलंदाजी विभाग सतत चांगले प्रदर्शन करत आहे. भारताला नक्कीच दक्षिण अफ्रिकेतील परिस्थिती आवडेल आणि गोलंदाजांना या परिस्थितीत गोलंदाजी करून मजा येईल,” असे झहीर पुढे म्हणाला.

तो पुढे बोलताना म्हणाला की, “फलंदाजी विभागाला धावफलकावर जास्त धावा लावण्याची गरज आहे आणि हे महत्वाचे आहे. परंतु, एक कसोटी सामना जिंकण्यासाठी २० विकेट्स घेणे गरजेचे आसेल. ज्याप्रकारे भारतीय गोलंदाज गोलंदाजी करत आहेत, ते असे अरू शकतात. मला विश्वास आहे की, हा भारतीय संघ दक्षिण अफ्रिकेत पहिली मालिका जिंकेल.”

महत्वाच्या बातम्या –

Video: चालू सामन्यात फुटबॉलपटूचा हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू, संघ सहकाऱ्यांचा आक्रोश पाहून पाणावतील डोळे

उत्तर प्रदेशचा एक प्रतिभाशाली फिरकीपटू, मात्र ‘त्याला’ खेळायला मिळाला एकच कसोटी सामना

Ashes: इंग्लंडसाठी पहिले पाढे पंचावन्न! बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

व्हिडिओ पाहा –

बॉक्सिंग डेचा अर्थ, त्याचा इतिहास आणि बरचं काही... | What is Boxing Day Test? History of Boxing Day

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---