---Advertisement---

मोठी बातमी! अवघे काही तास शिल्लक असतानाच पुढे ढकलली SA टी20 फायनल

---Advertisement---

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाकडून प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या एसए टी20 लीग ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. शनिवारी (11 फेब्रुवारी) स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार होता. मात्र, आता आयोजकांकडून ‌‌‌‌हा सामना 24 तास पुढे ढकलण्यात आला आहे. स्पर्धेचे संचालक ग्रॅमी स्मिथ यांनी याबाबतची घोषणा केली. 

 

आयपीएलच्या धर्तीवर सुरू केलेल्या या स्पर्धेत आयपीएलच्या संघमालकांनीच सहा संघ विकत घेतले होते. जवळपास महिनाभराच्या लीग स्टेजनंतर पार्ल रॉयल्स, प्रिटोरिया कॅपिटल्स, सनरायझर्स ईस्टर्न केप व जो’बर्ग सुपर किंग्स या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर प्रिटोरिया व ईस्टर्न केप यांनी अंतिम फेरीत आपली जागा बनवली. उभय संघांमध्ये अंतिम सामना जोहान्सबर्ग येथील वॉंडरर्स स्टेडियम येथे (11 फेब्रुवारी) खेळला जाणार होता.

अंतिम फेरीची तयारी सुरू असतानाच आयोजकांकडून अंतिम सामना एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा केली गेली. बुधवारपासून जोहान्सबर्ग येथे सातत्याने पाऊस होत आहे. मैदान अद्यापही ओलसर असल्याने, खेळपट्टी खेळण्यासाठी पुरेशी तयार नसल्याने हा अंतिम सामना 12 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. असे या निवेदनात म्हटले गेले आहे.

अचानकपणे सामना पुढे ढकलण्यात आल्यानंतर स्पर्धेचे संचालक स्मिथ म्हणाले,

“आम्ही सामनाधिकारी, संघ‌ व ग्राउंड्समन यांच्याशी चर्चा करून सामना दुसऱ्या दिवशी खेळण्याचा निर्णय घेतला. कारण,‌ प्रथमच आयोजित होत असलेल्या या स्पर्धेचा एक संस्मरणीय अंतिम सामना आम्हाला पाहायचा आहे.”

या स्पर्धेचे सर्व रूप हे आयपीएलप्रमाणे आहे. आयपीएल मधील संघमालकांचे सहा संघ व आयपीएलप्रमाणेच खेळाडूंचा लिलाव या स्पर्धेसाठी पार पडला होता. काही दिवसांपूर्वीच स्मिथ यांनी ही स्पर्धा आर्थिक दृष्ट्या व लोकप्रियतेच्या दृष्टीने यशस्वी झाल्याची घोषणा केली होती.

(SA T20 League Final Postponed Due To Wet Outfield It Play On 12th February)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतासाठी धोक्याची घंटा! ऑस्ट्रेलियाने मायदेशाहून बोलावला हुकमी एक्का, कोण आहे तो?
भारताच्या विजयांमध्ये सर्वात मोठे योगदान अश्विनचेच, भज्जी अन् झहीर खान तर लईच लांब

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---