भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (virat kohli) याने चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा केली आहे. भारतीय आणि दक्षिण अफ्रिका (south africa vs india test series) यांच्यातील पहिल्या सामन्यान कोहलीने निराशाजनक प्रदर्शन केले. बुधवारी (२९ डिसेंबर) सामन्याच्या चौथ्या दिवशी विराट कोहली पुन्हा एकदा चुकीचा फटका खेळून बाद झाला. सतत चुकीचा फटका खेळून विकेट गमावणाऱ्या विराटविषयी चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सेंचुरियनमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यातील विराटचे हे सलग दुसरे अपयश आहे. विराट या सामन्याच्या पहिल्या डावात ३५ धावा करून बाद झाला होता. पहिल्या डावात तो लुंगी एन्गिडीच्या चेंडूचा शिकार झालेल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात देखील तो स्वत्तात बाद झाला आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी लंचनंतर पहिल्याच चेंडूवर कोहलीने विकेट गमावली. दक्षिण अफ्रिकेचा पदार्पणवीर मार्को जेन्सनने त्याला १८ धावांवर तंबूत पाठवले.
दुसऱ्या डावाच्या ३३ व्या षटकात जेन्सन गोलंदाजीसाठी आला. षटकातील पहिल्याच चेंडूवर विराटच्या रूपात मोठा मासा त्याच्या गळाला लागला. हा पहिला चेंडू जेन्सनने स्टंप्सच्या बाहेर टाकला होता. याच चेंडूवर विराट त्याचा आवडीचा कव्हर ड्राईव्ह शॉट खेळण्याच्या नादात पुन्हा एकदा विकेट गमावून बसला. तत्पूर्वी पहिल्या डावात देखील विराटने त्याची विकेट कव्हर ड्राइव्ह खेळतानाच गमावली होती. अशात चाहत्यांनी विराटला सतत चुकीचा फटका खेळण्यासाठी ट्रोल केले आहे. कव्हर ड्राइव्ह फटका खेळताना विराटने अनेकदा विकेट गमावली आहे आणि आता चाहत्यांनी त्याच्या या चुकीचे भांडवल केले आहे. ट्वीटरवर विराट आणि त्याच्या कव्हर ड्राइव्हविषयी वेगवेगळे मीम्स आणि प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
चाहत्यांच्या सोशल मीडियावरील प्रतिक्रिया –
https://twitter.com/AbdullahNeaz/status/1476156463177289737?s=20
Ball going to outside off stump
Kohli's wicket to #Kohli#SAvsIND pic.twitter.com/XYbAq5ep9P
— Anshuman🍕 (@Anshuman84m2) December 29, 2021
Nothing just a Short love story of Virat Kohli and Outside off stump balls :-#INDvsSA #ViratKohli #Virat #Kohli pic.twitter.com/qoJg9kzNUt
— Innocent Child (@bholaladkaa) December 29, 2021
Wait continues💔#ViratKohli pic.twitter.com/Mbja3GN8rZ
— ऋतिक 🌪️ (@ritik22_) December 29, 2021
https://twitter.com/bigwily_/status/1476148323237040128?s=20
— s (@paddlesweep_) December 29, 2021
Virat Kohli dismissals in a nut shell#ViratKohli #Kohli #INDvsSA pic.twitter.com/uFPxvP0Jo1
— Sai Sandeep (@SaiSandeep275) December 26, 2021
विराटच्या प्रदर्शनाचा विचार केला तर, मागच्या दोन वर्षात तो अपेक्षित खेळ दाखवू शकला नाही. विराटने त्याचे शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात केले होते. त्यानंतर तो एकदाही शतकी खेळी करू शकला नाही. विराटचे या संपूर्ण वर्षातील कसोटी प्रदर्शन पाहिले, तर त्याने खेळलेल्या ११ कसोटी सामन्यांमध्ये ५३६ धावा केल्या आहेत आणि यामध्ये त्याच्या अवघ्या चार अर्धशतकांचा समावेश आहे.
दरम्यान, दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याचा विचार केला, तर भारतीय संघ सध्या भक्कम स्थितीत दिसत आहे. दक्षिण अफ्रिकेला विजय मिळवण्यासाठी शेवटच्या डावात ३०५ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. तत्पूर्वी, भारताने पहिल्या डावात ३२७ आणि दुसऱ्या डावात १७४ धावा केल्या होत्या. तर दुसरीकडे दक्षिण अफ्रिका संघ पहिल्या डावात १९७ धावांवर सर्वबाद झाला होता.
महत्वाच्या बातम्या –
वरिष्ठ ऑस्ट्रेलियन म्हणतोय, “भारतात कसोटी मालिका जिंकूनच निवृत्त होईल!”
‘या’ कारणाने रद्द करण्यात आला आशिया चषकातील महत्त्वपूर्ण सामना; क्षणात बदलली उपांत्य फेरीची समीकरणे
ऍशेस गमावलेल्या इंग्लंडला वॉर्नरने दिला ‘फुकटचा सल्ला’; म्हणाला…
व्हिडिओ पाहा –