टी20 विश्वचषक 2024 च्या पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अफगाणिस्तानची अवस्था बिकट झाली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी 11.5 षटकात 56 धावांत सर्वबाद झाला. या दरम्यान आफ्रिकेकडून मार्को जॅनसेन आणि तबरेझ शम्सी यांनी सर्वाधिक 3-3 बळी घेतले. अफगाणिस्तानकडून अजमतुल्ला ओमरझाईने सर्वाधिक 10 धावा केल्या. उमरझाई हा संघासाठी दुहेरी आकडा पार करणारा केवळ एकमेव फलंदाज होता.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानला पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर स्टार सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजच्या रुपाने पहिला धक्का बसला, तो खाते न उघडताच तंबूत परतला. त्यानंतर तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर 8 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 9 धावा करुन गुलबदिन नायब देखील तंबूत पॅव्हेलियनमध्ये परतला.
त्यानंतर चौथ्या षटकात अफगाणिस्तानने दोन विकेट गमावल्या. आफ्रिकेसाठी डावातील चौथे षटक आणणाऱ्या कागिसा रबाडाने पहिल्या चेंडूवर इब्राहिद झद्रान (02) आणि नंतर चौथ्या चेंडूवर मोहम्मद नबी (00) यांना बाद केले. त्यानंतर पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर संघाला पाचवा धक्का नांगेलिया खरोटे (00) च्या रूपाने बसला.
यानंतर सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अजमतुल्ला उमरझाईच्या रूपाने संघाने सहावी विकेट गमावली, ज्याने 12 चेंडूंत 2 चौकारांसह 10 धावा केल्या. त्यानंतर 10व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर करीम जनात 13 चेंडूत 1 चौकाराच्या मदतीने 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर त्याच षटकातील ५व्या चेंडूवर नूर अहमद खाते न उघडता बाद झाला. त्यानंतर चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असलेला कर्णधार राशिद खान 11व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. राशिदने 8 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 8 धावा केल्या. यानंतर संघाने शेवटची म्हणजेच 10वी विकेट नवीन उल हकच्या रुपात गमावली, जो 8 चेंडूत केवळ 2 धावा करू शकला. अश्या स्थितीत अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिका समोर 57 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
महत्तवाच्या बातम्या-
आश्चर्यकारक! यंदाच्या टी20 विश्वचषक स्पर्धेत रोहित-बटलरची आकडेवारी समान
विराट कोहलीचा 8 वर्षापूर्वीचा ‘हा’ गोलंदाजी रेकाॅर्ड निघणार का मोडीत?
टी20 क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध रोहित-विराटचं वर्चस्व! पहा आकडेवारी