---Advertisement---

असं काय केलं की एकाच संघातील ते दोघेही ठरले सामनावीर पुरस्कारचे मानकरी

---Advertisement---

बुधवारी (4 मार्च) ब्लोमफोंटेन येथे दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात (South Africa Vs Australia) दुसरा वनडे सामना (2nd ODI) पार पडला. हा सामना दक्षिण आफ्रिकेने 6 विकेट्सने जिंकत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 षटकात सर्वबाद 271 धावा केल्या. यावेळी दक्षिण आफ्रिका संघाचा गोलंदाज लुंगी एन्गिडीने (Lungi Ngidi) सर्वाधिक 6 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. त्याने 10 षटकात 58 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. 

यानंतर दक्षिण आफ्रिका संघाकडून सलामीला फलंदाजी करताना जानेमन मलानने (Janneman Malan) शतकी खेळी केली. त्याने 92.81च्या स्ट्राईक रेटने नाबाद 129 धावा केल्या. यात 7 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. त्याच्या या शतकामुळे दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचे 272 धावांचे आव्हान सहज पार केले.

त्यामुळे या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या विजयात एन्गिडीबरोबरच मलाननेही मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे या दोघांनाही या सामन्यात संयुक्त सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे खूप कमी वेळा झाले आहे की एकाच सामन्यात 2 खेळाडूंना सामनावीर पुरस्कार मिळाला आहे. संभवत: पहिल्यांदाच वनडे क्रिकेटमध्ये एकाच संघातील 2 खेळाडूंना हा पुरस्कार देण्याची घटना घडली आहे. मायदेशात झालेल्या यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय हंगामातील सर्व प्रकारांच्या एकूण पाच मालिकांमधील हा दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यातून वनडेत पदार्पण करणारा 23 वर्षीय मलान पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूत बाद झाला होता. पण दुसऱ्या सामन्यात त्याने शतक ठोकत त्याचे नाणे खणखणीत वाजवले आहे. मात्र असे असले तरी मलानला 12 मार्चपासून भारताविरुद्ध सुरु होणाऱ्या वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघात प्रवेश देण्यात आलेला नाही.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डी कॉक हा मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीवर पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर फलंदाजी करताना मलानने जॉन जॉन स्मट्स, हेनरिच क्लासेन आणि डेविड मिलरला साथीला घेत दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

धोनीबद्दलचा ‘तो’ प्रश्न ठरला निवडकर्त्यांच्या मुलाखतीत महत्त्वाचा

रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्याआधी सौराष्ट्रासाठी ही आहे सर्वात मोठी बातमी

टीम इंडियाविरुद्ध फायनल खेळताना ऑस्ट्रेलियाला जाणवणार ‘त्या’ खेळाडूची कमतरता

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---