क्रिकेट विश्वचषकात शनिवारी (12 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. नाणेफेक गमावल्यानंतर आफ्रिकी संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाले. निर्धारीत 50 षटकांच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकने 7 विकेट्सच्या नुकसानावर 311 धावा केल्या. यात सलामीवीर क्विंटन डी कॉक याचे शतक, तर ऍडेन मार्करम याचे अर्धशतक महत्वाचे ठरले.
ऑस्ट्रेलियासाठी या सामन्यात मिचेल स्टार्क याने 3 विकेट्स घेतल्या, तर ग्लेन मॅक्सवेल याला दोन विकेट्स मिळाल्या. जोश हेजलवूड, पॅट कमिन्स आणि ऍडम झाम्पा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. दक्षिण आप्रिकेचा स्टार फलंदाज आणि सलामीवीर क्विंटन डी कॉक () वनडे विश्वचषक संपल्यानंतर या फॉरमॅटमधून निवृत्त होणार आहे. अशात विश्वचषक सामन्यांमध्ये डी कॉकचे अप्रतिम प्रदर्शन पाहायला मिळत आहे. शनिवारी (12 ऑक्टोबर) डी कॉकने विश्वचषकातील आपले सलग दुसरे शतक केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना डी कॉकने 90 षटकात शतक पूर्ण केले. त्याने एकूण 106 चेंडू खेळले आणि 109 धावांचे योगदान संघासाठी दिले. ऍडेन मार्करम याने 44 चेंडूत 56 धावांची खेळी केली. (SA vs AUS Australia need 312 to win their first match in World Cup 2023)
विश्वचषकातील दहाव्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ऍडम झाम्पा, जोश हेझलवूड.
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी.
महत्वाच्या बातम्या –
‘रोहित रिस्क घेऊन खेळतो, म्हणूनच तो…’, भारतीय दिग्गजाचे ‘हिटमॅन’विषयी लक्षवेधी भाष्य
शतक ठोकलं रोहितनं, पण विराटला झाला सर्वाधिक आनंद; सर्वत्र होतंय कौतुक