बांगलादेश संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. दक्षिण अफ्रिका आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा दुसरा सामना जोहान्सबर्गमध्ये रविवारी (२० मार्च) खेळला गेला. यजमान दक्षिण अफ्रिका संघाने या सामन्यात बांगलादेशला ७ विकेट्सने पराभूत केले आणि मालिकेत १-१ अशी बरोबर साधली. आयपीएल फ्रेंचायझी लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजांब किंग्जसाठी या सामन्यात चांगली बाब समोर आली. क्विंटन डी कॉक आणि कगिसो रबाडा या दक्षिण अफ्रिकन क्रिकेटपटूंचे प्रदर्शन सामन्यात अप्रतिम राहिले.
उभय संघातील या एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना बांगलादेशने जिंकला होता आणि आघाडी घेतली होती. आता दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून दक्षिण अफ्रिका संघ बरोबरीवर आला आहे. या दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघ अवघ्या १९४ धावा करू शकला. प्रत्युत्तरात दक्षिण अफ्रिका संघाने अवघ्या ३७.२ षटकांमध्ये तीन विकेट्सच्या नुकसानावर हे लक्ष्य गाठले. रबाडा आणि डी कॉक हे दक्षिण अफ्रिकेच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
आयपीएल फ्रेंचायझी लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांनी यष्टीरक्षक फळंदाज क्विंटन डी कॉकसाठी (Quinton De Kock) मेगा लिलावात ६.७५ कोटी खर्च करून त्याला विकत घेतले होते. तसेच कगिसो रबाडा (Kagiso Rabada) याला खरेदी करण्यासाठी पंजाब किंग्ज (Punjab Kings) फ्रेंचायझीने मेगा लिलावात ९.२५ कोटी रुपये खर्च केले आहेत.
रबाडाने बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात १० षटके गोलंदाजी केली आणि यादरम्यान ३९ धावा देऊ महत्वाच्या ५ विकेट्स घेतल्या. रबाडाच्या कारकिर्दीतील ही दुसरी वेळ आहे, जेव्हा त्याने एकदिवसीय सामन्यात ५ विकेट्सचा हॉल घेतला आहे, तर दुसरीकडे डी कॉकने ४१ चेंडूचा सामना करून ६२ धावा केल्या.
बांगालेदशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण संघ चांगली सुरुवात करू शकला नाही. अवघ्या ३४ धावांवर बांगलादेशने ५ विकेट्स गमावल्या होत्या. पण अफीप हुसेनच्या ७२ आणि मेहदी हसनच्या ३८ धावांच्या जोरावर बांगलादेशने १९४ धावा केल्या. प्रत्युत्तारात दक्षिण अफ्रिकेसाठी क्विंटन डी कॉकने अप्रतिम प्रदर्शन केले. डी कॉक व्यतिरिक्त जानेमल मलानने २५ धावा केल्या. डीकॉक आणि मलान यांनी पहिल्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली. तसेच कर्णधार तेंबा बावुमाने ३७ धावा केल्या. कायल वेरिनने ५८ धावा केल्या आणि शेवटपर्यंत नाबाद राहिला.
महत्वाच्या बातम्या –
आनंदाची बातमी! केरला ब्लास्टर्सला नमवत हैदराबादचा दणक्यात विजय; आयएसएल विजेतेपदावर कोरले नाव
हवेत डाईव्ह मारत इंग्लंडच्या कर्णधाराने टिपला शानदार कॅच; फलंदाजालाही बसेना विश्वास; VIDEO VIRAL
इंग्लंडच्या फलंदाजीपुढं न्यूझीलंडच्या गोलंदाजांची दैना, १ विकेटने मिळवला विजय