दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ढाका येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळला गेला. ज्यामध्ये पाहुण्याने 7 गड्यांनी यजमान संघाचा पराभव केला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. तर यासोबतच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही झेप घेतली. या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिका WTC गुणतालिकेत सहाव्या स्थानावर होता. तर बांग्लादेश सातव्या स्थानावर होता. मात्र ढाका कसोटी संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दोन स्थानांनी झेप घेत 6व्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर बांग्लादेश सातव्या स्थानावर घसरला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या या विजयामुळे न्यूझीलंड आणि इंग्लंडने प्रत्येकी 1 स्थान गमावले आहे. भारताविरुद्धची पहिली कसोटी जिंकल्यानंतर किवी संघ चौथ्या स्थानावर पोहोचला होता. मात्र आता ताज्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर घसरला आहे.
इंग्लंड सध्या पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनंतर इंग्लंड पाचव्या स्थानावर होता. मात्र आता तो सहाव्या क्रमांकावर घसरला आहे. तर पाकिस्तान आठव्या स्थानावर कायम आहे.
टीम इंडियाबद्दल बोलायचे झाले तर, न्यूझीलंडविरुद्ध बेंगळुरू कसोटीत पराभव होऊनही रोहित शर्मा आणि कंपनी पहिल्या स्थानावर कायम आहे. भारताची विजयाची टक्केवारी 68.06 आहे. भारतासोबतच ऑस्ट्रेलिया टॉप-2 मध्ये आहे, ज्यांची विजयाची टक्केवारी 62.50 आहे.
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या बांग्लादेश संघाच्या फलंदाजांनी पहिल्या डावात निराशाजनक कामगिरी केली. अवघ्या 106 धावांवर संपूर्ण संघ गडगडला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 308 धावा केल्या आणि पहिल्या डावानंतर 202 धावांची आघाडी घेतली. यादरम्यान यष्टीरक्षक काइल वेरेनने शानदार शतक झळकावले. त्याने 114 धावांची खेळी खेळली. बांग्लादेशने दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी करत 307 धावा केल्या. पण पहिल्या डावातील तोटा त्यांना भरून काढता आला नाही.
परिणामी दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 106 धावांचे लक्ष्य मिळाले होते. जे संघाने केवळ 22 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केले. मालिकेतील दुसरा सामना 29 ऑक्टोबरपासून चितगाव येथे खेळवला जाणार आहे.
हेही वाचा-
हा भारतीय खेळाडू बनतोय बळीचा बकरा? प्लेइंग एलेव्हनमधून पुन्हा एकदा विनाकारण वगळलं
Indian hockey team; पॅरिस ऑलिम्पिक यशानंतर भारताचा पहिला पराभव
टी20 क्रिकेटमधील सर्वात मोठ्या स्कोरसह झिम्बाब्वेनं बनवले अनेक रेकॉर्ड!