---Advertisement---

विक्रमांची लागणार रास! केपटाऊन कसोटीत तब्बल सात खेळाडूंकडे पराक्रमांची सुवर्णसंधी

On: सोमवार, जानेवारी 10, 2022 11:52 PM
india-test-team
---Advertisement---

भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (india tour of south africa) आहे. दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्या दोन कसोटी सामना खेळले गेले आहेत आणि तिसरा कसोटी सामना केपटाऊमध्ये ११ जानेवारीपासून खेळला जाणार आहे. तत्पूर्वी, सेंचुरियनमध्ये खेळलेल्या पहिल्या सामन्यात भारताने ११३ धावांनी विजय मिळवला होता. तर, जोहान्सबर्गमधील दुसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने सात विकेट्स राखून विजय मिळवला होता. कसोटी मालिका सध्या १-१ अशा बरोबरीवर आहे आणि शेवटच्या कसोटीत विजय मिळवणारा संघ मालिकाही जिंकेल.

भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेत आतापर्यंत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. अशात शेवटच्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ इतिहास घडवू शकतो. दरम्यान, केपटाऊन कसोटीत भारतीय आणि दक्षिण अफ्रिका संघातील काही खेळाडूंकडे खास विक्रम करण्याची संधी आहे. आपण या लेखात अशाच काही खेळाडूंवर नजर टाकणार आहोत, जे केपटाऊन कसोटीत स्वतःच्या नावावर खास विक्रमाची नोंद करू शकतात.

विराट कोहली-

विराट कोहलीकडे केपटाऊन कसोटीत ऑस्ट्रेलिया संघाचे महान कर्णधार स्टीव वॉ यांची बरोबरी करण्याची संधी आहे. स्टीव वॉने ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करताना ४१ कसोटी सामने जिंकले आहेत. विराटला त्यांची बरोबरी करण्यासाठी फक्त एका कसोटी विजयाची आवश्यकता आहे. विराटच्या नेतृत्वातील भारतीय संघ केपटाऊनमध्ये जिंकला तर, तो दक्षिण अफ्रिकेत विजय मिळवणारा पहिला भारतीय कर्णधार ठरेल, तसेच दिग्गज स्टीव वॉ यांची बरोबरी देखील करेल.

फलंदाजाच्या रूपात देखील विराट केपटाऊन कसोटी सामन्यात खास विक्रम करू शकतो. या सामन्यात विराटने जर १४६ धावा केल्या, तर तो स्वतःच्या ८००० कसोटी धावा पूर्ण करेल. त्याव्यतिरिक्त त्याने जर दोन झेल घेतले, तर कसोटी क्रिकेटमधील १०० झेल पूर्ण करेल.

रविचंद्रन अश्विन-

भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनसाठी केपटाऊन कसोटी सामना खूपच खास असणार आहे. अश्विनने जर या सामन्यात पाच विकेट्स घेतल्या, तर तो माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांचा विक्रम मोडीत काढेल. तो या सामन्यात कपिल देव यांना मागे टाकून अनिल कुंबळेंनंतर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरेल. कपिल देव यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीत ४३४ विकेट्स घेतल्या आहेत, तर अश्विन सध्या ४३० विकेट्सच्या टप्प्यावर आहे.

चेतेश्वर पुजारा-

भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा केपटाऊन कसोटीत माजी दिग्गज दिलीप वेंगसरकर यांचा विक्रम मोडू शकतो. केपटाऊनमध्ये अवघ्या ८ धावा केल्या, तर पुजारा वेगसरकरांच्या ६६६८ कसोटी धावांचा आकडा पार करेल.

अजिंक्य रहाणे-

अजिंक्य रहाणेदेखील केपटाऊन कसोटीत मोठा विक्रम करू शकतो. या सामन्यात रहाणेने जर ७९ धावा केल्या, तर तो स्वतःच्या ५००० कसोटी धावा पूर्ण करेल. कसोटी क्रिकेटमध्ये ५००० धावा करणारा तो १३ वा भारतीय फलंदाज ठरेल. तसेच त्याने जर या सामन्यात एक झेल घेतला, तर तो १०० कसोटी झेल देखील पूर्ण करेल.

मोहम्मद शमी-

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी या सामन्यात नवीन अर्धशतक करू शकतो. शमी केपटाऊनमध्ये जर पाच विकेट्स घेऊ शकला, तर तो दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या ५० कसोटी विकेट्स पूर्ण करेल. यापूर्वी फक्त रविचंद्रन अश्विन, हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे यांनी दक्षिण अफ्रिकेविरुद्ध ५० कसोटी विकेट्स घेतल्या आहेत.

कगिसो रबाडा-

दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने आतापर्यंत ४९ कसोटी सामन्यात स्वतःच्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. केपटाऊन कसोटी त्याच्या कारकिर्दीतील ५० कसोटी सामना असेल. आतापर्यंत खेललेल्या ४९ कसोटी सामन्यांमध्ये त्याने २२.५७ च्या सरासरीने २२६ विकेट्स घेतल्या आहेत.

एडेन मार्करम-

दक्षिण अफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज एडेन मार्करम केपटाऊन कसोटीत स्वतःच्या २००० कसोटी धावा पूर्ण करू शकतो. हा आकडा गाठण्यासाठी त्याला अजून १२४ धावांची आवश्यकता आहे.

महत्वाच्या बातम्या –

जयपुरविरुद्ध दिल्लीने चाखली पहिल्या पराभवाची चव! नवीन २८ सामन्यांनंतर सुपर टेन करण्यात अपयशी

संगमनेरच्या निमगाव पागा येथील रिया श्रीलंकेत दाखवणार जादू! आमदार निलेश लंकेंची मोठी मदत

अखेर पंतच्या बेजबाबदार खेळण्यावर कर्णधार कोहली बोललाच! वाचा काय म्हटलंय त्याने

व्हिडिओ पाहा –

सचिनच्या सल्ल्याने पालटली कारकीर्द पण सचिनमुळेच जगभर ट्रोल झालेला Lord Thakur |  Sachin Tendulkar

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---