भारतीय क्रिकेट संघ नोव्हेंबरमध्ये चार सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेतील पहिला टी20 सामना 8 नोव्हेंबर रोजी हॉलिवूडबेट्स किंग्समीड स्टेडियमवर खेळवला जाईल. दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्ड (CSA) आणि भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) यांनी शुक्रवारी संयुक्त निवेदनात याची घोषणा केली.
दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांच्या निवेदनानुसार, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिका 8 नोव्हेंबरपासून डर्बनच्या किंग्समीड स्टेडियमवर सुरु होणार आहे. त्यानंतर दुसरा टी20 सामना 10 नोव्हेंबरला गाकबेरहामध्ये, तिसरा टी20 सामना 13 नोव्हेंबरला सेंच्युरियनमध्ये आणि चौथा आणि शेवटचा टी20 सामना 15 नोव्हेंबरला जोहान्सबर्गमध्ये खेळवला जाईल.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष लॉसन नायडू यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटला सतत पाठिंबा दिल्याबद्दल मी बीसीसीआय आणि जागतिक क्रिकेटचे आभार मानू इच्छितो. भारतीय क्रिकेट संघाचा आपल्या मातीतला दौरा नेहमीच रोमांचक असतो. मला माहित आहे की आमचे चाहते उत्सुक असतील. या मालिकेची वाट पाहत आहे, ज्यामध्ये दोन्ही संघांचे कौशल्य दाखवले जाईल.”
बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, “भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात नेहमीच घट्ट नाते आहे, ज्याचा दोन्ही देशांना अभिमान आहे. भारतीय क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेच्या चाहत्यांकडून नेहमीच कौतुक आणि प्रेम मिळाले आहे आणि तेच वर्तन भारतीय संघालाही दिले गेले आहे. भारतीय चाहतेही दक्षिण आफ्रिकेकडे पाहतात.
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक
पहिला टी20 – 8 नोव्हेंबर – हॉलिवूडबेट्स किंग्समीड स्टेडियम
दुसरा टी20 – 10 नोव्हेंबर – सेंट जॉर्ज पार्क
तिसरा टी20- 13 नोव्हेंबर सुपरस्पोर्ट पार्क
चाैथा टी20- 15 नोव्हेंबर- डीपी वर्ल्ड वंडरर्स
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघ घरच्या मैदानावर बांग्लादेश आणि न्यूझीलंडशी भिडणार आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यात 2 कसोटी आणि 3 टी-20 सामने खेळणार आहे. बांग्लादेशविरुद्धची मालिका संपल्यानंतर चार दिवसांनी भारतीय संघ न्यूझीलंडसोबत ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात करणार आहे.
महत्तवाच्या बातम्या-
मैदानाबाहेरही थालाचीच हवा! या कंपनीने काढली चक्क धोनीच्या नावाची कार
भारतीय संघाचं वेळापत्रक जाहीर, महाराष्ट्रात 5 सामने खेळले जाणार; पुण्यात किती सामन्यांचं आयोजन?
टी20 विश्वचषकादरम्यान ‘या’ खेळाडूला मोठा धक्का; जाणून घ्या काय झाले नुकसान!