---Advertisement---

IND vs SA: ‘शार्दुलऐवजी अश्विनला खेळवा’, दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी माजी दिग्गजाचा भारतीय संघाला सल्ला

On: मंगळवार, जानेवारी 2, 2024 5:34 PM
R-Ashwin-And-Shardul-Thakur
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फक्त रविचंद्रन अश्विन यानेच खेळावे, असे मत भारताचे माजी सलामीवीर कृष्णमाचारी श्रीकांत यांनी व्यक्त केले. श्रीकांतच्या मते शार्दुल ठाकूर याला वगळले पाहिजे आणि अश्विनला खेळवले पाहिजे.

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra jadeja) दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. त्याला पाठीचा त्रास होता आणि त्यामुळेच त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. त्याच्या जागी रविचंद्रन अश्विन (R Ashwin) याला खेळण्याची संधी मिळाली पण तो फलंदाजीत विशेष काही करू शकला नाही. जडेजा दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच आता अश्विनला बाहेर बसवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कृष्णमाचारी श्रीकांत (Krishnamachari Srikanth) यांच्या मते जडेजा आणि अश्विन या दोघांना दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळवले जावे आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याला वगळले पाहिजे. श्रीकांत त्यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाले, “मी अजूनही अश्विनला खेळणार आहे. अश्विन हा शार्दुल ठाकूरपेक्षा चांगला गोलंदाज आहे, असे माझे मत आहे. शार्दुलऐवजी मी अश्विनला संधी देईन. जर त्याने पाच विकेट्स घेतल्या नाहीत, तर तो किमान दोन-तीन विकेट्स नक्कीच घेईल. याशिवाय तो जडेजासह चांगल्या लाइनवर गोलंदाजी करेल. हे दोन गोलंदाज मिळून 4-5 विकेट्स घेऊ शकतात.”

भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते आणि त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. मात्र, आता दुसरी कसोटी जिंकून रोहित शर्मा आणि कंपनीला मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवायची आहे. दुसरीकडे, प्रोटीज संघाला हा सामना जिंकून भारतीय संघाne क्लीन स्वीप द्यायचा आहे. (Play Ashwin instead of Shardul former legend advises Indian team ahead of second Test)

हेही वाचा

वानखेडेत फिबी लिचफिल्डने साकारले दुसरे वनडे शतक! पहिल्या विकेटसाठी भारताने केले 29 षटके गोलंदाजी
रोहित शर्मानंतर कर्णधार कोण? इरफान पठाणने टीम इंडियाला दिला मोलाचा सल्ला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---