दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यातील तिसरा एकदिवसीय (sa vs ind odi series) सामना रविवारी (२३ जानेवारी) केपटाऊनमध्ये खेळला गेला. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याची सुरुवात भारतासाठी चांगली ठरली. वेगवान गोलंदाज दीपक चहर (deepak chahar) याला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडले गेले आणि त्याने सुरुवातीच्या षटकांमध्ये संघाला एक महत्वपूर्ण विकेट मिळवून दिली. ही विकेट दक्षिण अफ्रिकेसाठी एक मोठा झटका होता, तर भारतासाठी तीन वर्षांनंतर मिळालेले खास यश.
उभय संघातील या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या गोलंदाजीची सुरुवात दीपक चहरने केली. पहिल्या षटकात त्याने दक्षिण अफ्रिकी फलंदाजांना फक्त दोन धावा दिल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकात तो पुन्हा गोलंदाजीसाठी आला आणि षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जानेमन मलान (janneman malan) याची विकेट घेतली. दक्षिण अफ्रिका संघाची धावसंख्या ८ असताना त्यांचा सलामीवीर चहरच्या चेंडूवर तंबूत परतला.
२०१९ विश्वचषकानंतर पहिल्यांदाज भारतीय संघाने केली ही कामगिरी
ही विकेट भारतासाठी खूपच खास ठरली. मलान ज्यावेळी बाद झाला त्यावेळी त्याची वैयक्तिक धावसंख्या १ होती. मात्र, मागच्या एकदिवसीय सामन्यात त्याने भारतीय गोलंदाजांची धुलाई करत अर्धशतक ठोकले होते. दरम्यान, २०१९ विश्वचषकानंतर पहिल्यांदाच एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाज एखाद्या संघाची पहिली विकेट १० पेक्षा कमी धावसंख्येत मिळवू शकले आहेत. याच कारणास्तव दीपक चहरचे या सामन्यातील योगदान महत्वाचे ठरले.
दरम्यान, नवीन चेंडूने चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणाऱ्या दीपक चहरने जानेमन मलानला भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतच्या हाती झेलबाद केले. ही चहरच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ७ वी विकेट ठरली आहे, जी त्याने कारकिर्दीतील ६ व्या एकदिवसीय सामन्यात घेतली. यापूर्वी खेळलेल्या ५ एकदिवसीय सामन्यांमध्ये चहरने ६ विकेट्स घेतल्या होत्या. चहरचा दक्षिण अफ्रिकेविरुद्ध हा पहिला एकदिवसीय सामना ठरला आहे. यापूर्वी त्याने वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेविरुद्ध प्रत्येकी २-२ एकदिवसीय सामने खेळले आहेत, तर अफगाणिस्तानविरुद्ध १ एकदिवसीय सामना खेळला आहे.
महत्वाच्या बातम्या –
आयसीसीने केली वर्षातील सर्वोत्तम पुरुष व महिला टी२० खेळाडूंची घोषणा; घ्या जाणून कोण आहेत मानकरी
रडू की हसू…! एकाच चेंडूवर २ वेळा गेली विकेट, विचित्र पद्धतीने रनआऊट झाला आंद्रे रसेल
व्हिडिओ पाहा –