दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला होता, तर १९ जानेवारी पासून या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. या सामन्यात भारतीय संघाला ३१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह दक्षिण आफ्रिका संघाने या मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. दरम्यान, या सामन्याबाबत आयसीसी (icc) कडून एक मोठी अपडेट समोर आली आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेली मालिका वनडे सुपर लीग स्पर्धेचा (icc oneday super league) भाग नसणार आहे. आयसीसीने अधिकृतरित्या याबाबत माहिती दिली आहे. आयसीसीच्या स्पष्टपणे सांगितले आहे की, सर्व प्रकारच्या वनडे मालिका या आयसीसी सुपर लीग स्पर्धेत मोडत नाही.
याबाबत बोलताना आयसीसीने म्हटले की, “जर दोन संघांमध्ये तीन सामन्यांची मालिका खेळली गेली, तर त्याची वनडे सुपर लीगमध्ये गणना होणार नाही. दोन संघांमध्ये किमान चार किंवा पाच सामन्यांची मालिका असली पाहिजे. परंतु, केवळ तीन वनडे सामन्यांची मालिका केवळ गुणांसाठी मोजली जाईल.”
अधिक वाचा – ‘पालघर एक्सप्रेस’चा दक्षिण आफ्रिकेत बोलबाला!! ‘हा’ पराक्रम करणारा शार्दुल एकमेव भारतीय
आयसीसीने या स्पर्धेचे स्वरूप समजावून सांगताना म्हटले की, “सर्व संघांना ८ संघाविरुद्ध वनडे सामन्यांची मालिका खेळण्याची संधी मिळते. ज्यामध्ये ४ मालिका या मायदेशात असतात, तर ४ मालिका परदेशात असतात. याचा अर्थ असा की, सर्व संघांना २४ वनडे सामने खेळण्याची संधी मिळते. प्रत्येक सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला १० गुण दिले जातात. तर सामना अनिर्णीत राहिल्यास, बरोबरीत राहिल्यास ५ गुण दिले जातात.”
व्हिडिओ पाहा – २०११ विश्वचषक भारताचे हिरो, ज्यांचे योगदान आज कोणाला आठवत नाही
पुढच्या महिन्यात वेस्ट इंडिज संघाविरुद्ध होणारी मालिका ही वनडे सुपर लीग स्पर्धेचा भाग असणार आहे. तर ९ ते १४ जुलै दरम्यान इंग्लंड संघाविरुद्ध होणारी वनडे मालिका ही सुपर लीग स्पर्धेचा भाग नसणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत एकूण ९ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका दौऱ्याचा समावेश आहे. भारतीय संघ ४९ गुणांसह सातव्या स्थानावर आहे. यासह भारताकडे २०२३ विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी गुण फारसे महत्त्वाचे नसणार आहे. भारतीय संघाला थेट प्रवेश मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
तीन वर्षे आणि तब्बल २३३ चेंडूंनंतर बुमराहला मिळाली ‘ती’ विकेट, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संपवला दुष्काळ
चार चेंडूवर ४ बळी!! विश्वास नाही बसणार पण हे घडलंय, BBLमध्ये ऑसी गोलंदाजाचा भन्नाट कारनामा
हे नक्की पाहा: