दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यातील दुसरा एकदिवसीय (sa vs ind odi series) सामना शुक्रवारी (२१ जानेवारी) खेळला गेला. दक्षिण अफ्रिकेने या सामन्यात सात विकेट्सने विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघाच्या हातातून कसोटी मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिका देखील गेली आहे. याच पार्श्वभूमीवर माजी खेळाडू आणि चाहत्यांकडून भारतीय संघावर टीका केली जात आहे. आता याच साखळीत भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) जोडले गेले आहेत. मांजरेकरांनी भारताच्या फिरकी गोलंदाजीविषयी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
मांजरेकरांनी भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनवर (Ravichandran Ashwin) प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, मी सुरुवातीलपासूनच सांगत आहे की, अश्विनचे पुनरागमन कोणत्याही कारणाशिवाय झाले आहे. त्याची दावेदारी मजबूत नव्हती. परंतु, कोणाच्या तरी सांगण्यावरून त्याला संधी मिळाली. मात्र, भारतीय संघाला जाणवत असेल की, तो तसा फिरकी गोलंदाज नाहीये, ज्याची सध्या संघाला गरज आहे.
मांजरेकरांच्या मते भारतीय संघाला सध्या अशा फिरकी गोलंदाजाची गरज आहे, जो त्यांना मधल्या षटकांमध्ये विकेट मिळवून देईल. पुढे बोलताना ते म्हणाले, फिरकी गोलंदाजाच्या रूपात युजवेंद्र चहलचे प्रदर्शन देखील कमी पडत आहे. पुढे त्यांनी असा निष्कर्ष काढला की, भारतीय संघाला कुलदीप यादवकडे (Kuldeep Yadav) पुन्हा गेले पाहिजे. कारण, तो सामन्याच्या मधल्या षटकांमध्ये महत्वाच्या विकेट्स मिळवून देईल. भारतीय संघाला त्या दिवसांमध्ये माघारी जाण्याची गरज आहे, जेव्हा त्यांना मधल्या षटकांमध्ये विकेट्स मिळत होत्या.
मांजरेकरांनी पुढे सांगितले की, भारताचे सध्याचे फिरकी गोलंदाजांचे आक्रमत सर्वश्रेष्ठ नाहीये. अश्विन चा एक दैदिप्यमान भूतकाळ आहे. चहल भारतीय संघाचा एकेकाळचा उत्कृष्ट एकदिवसीय फिरकी गोलंदाज राहिला आहे. मात्र, तुम्ही पाहाल की, त्याची क्षमता देखील कमी होत आहे. मांजरेकर पुढे असेही म्हणाले की, मागच्या मोठ्या काळापासून भारताचे हे फिरकी आक्रमण कमजोर राहिले आहे.
दरम्यान, दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचा विचार केला, तर रविचंद्रन अश्विनने यामध्ये एकही विकेट घेतली नाही. त्याने सामन्यात एकूण १० षटके टाकली आणि सर्वाधिक ६८ धावा खर्च केल्या. भारतीय गोलंदाजांपैकी शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह या तीन गोलंदाजांनी प्रत्यकी एक-एक विकेट घेतली. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने सात विकेट्स राखून भारताला धूळ चारली.
महत्वाच्या बातम्या –
“टीम इंडियाला अतिआत्मविश्वास नडला”
ना गोलंदाजीत, ना फलंदाजीत कमाल! द. आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वनडेत भारताच्या पराभवाची ४ मुख्य कारणे
व्हिडिओ पाहा –