भारत आणि दक्षिण (sa vs ind test series) अफ्रिका यांच्यात केप टाऊनमध्ये सध्या तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. उभय संघातील तीन सामन्यांची कसोटी मालिका सध्या बरोबरीवर आहे आणि हा तिसरा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. अशात या तिसऱ्या सामन्यात विजयासाठी दोन्ही संघांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मैदानावरील पंच अनुभवी मराइस इरासमस (marais erasmus) आणि भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली (virat kohli) यांच्यात देखील तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सामन्याच्या पहिल्या डावात चांगली गोलंदाजी केली. त्याने पहिल्या डावात दक्षिण अफ्रिकेच्या दोन खेळाडूंची विकेट घेतली. असे असले तरी, पहिल्या सत्रात मोहम्मद शमी (Mohammad Shami) रंगात दिसत नव्हता. याच वेळी त्याला पंच इरासमस यांनी चेतावणी दिली. पंचांच्या मते तो खेळपट्टीच्या मध्ये धावत होता, ज्या भागाला डेंजर एरिया असे म्हटले जाते. परंतु विराट पंचांच्या या निर्णयानंतर नाराज झाल्याचे पाहायला मिळाले.
व्हिडिओ पाहा-
खेळपट्टीच्या मधोमध असलेल्या डेंजर एरियामध्ये जर, एखादा गोलंदाज वारंवार शिरकाव करत असेल, तर पंच त्याला हटवण्याचा निर्णय घेऊ शकतात. अशात विराटने पंचांचा ही चेतावणी गंभीरतेने घेतली. परंतु नंतर रिप्लेमध्ये पाहिल्यावार दिसले की, शमीचा पाय डेंजर एरियाच्या बाहेर पडला होता. विराट कोहली त्याच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो, अशात पंचांनी शमीला दिलेल्या चेतावणीविषयी देखील त्याने स्पष्ट भूमिका घेत, पंचांना याबाबत विचारणा केली.
दरम्यान, नंतर शमीने टाकलेले सर्व चेंडू पाहिल्यानंतर स्पष्ट झाले की, पहिले तीन चेंडू टाकताना तो डेंजर एरियामध्ये गेला होता. याच कारणास्तव पंचांनी त्याला चेतावणी दिली होती. असे असले तरी, शमीने या संपूर्ण प्रकारानंतर जोरदार पुनरागमन केले आणि तीन चेंडूत दोन विकेट्स घेतल्या. त्याने पहिल्या डावाच्या ५६ व्या षटकात दक्षिण अफ्रिकेच्या टेंबा बावुमा आणि काइल वेरेयन यांच्या विकेट्स घेतल्या.
https://twitter.com/realRahulsarsar/status/1481214493263011842?s=20
दरम्यान, भारतीय संघाने सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय सघ २२३ धावांवर सर्वबाद झाला. यामध्ये विराट कोहलीने सर्वाधिक ७९ धावांची खेळी केली. त्यानंतर दक्षिण अफ्रिका संघ त्यांच्या पहिल्या डावात २१० धावांवर गुंडाळला गेला. भारताच्या जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या.
महत्वाच्या बातम्या –
हे काय? कॅच सुटला, मग चेंडू मैदानावरील हेल्मेटला धडकला अन् द. आफ्रिकेला फुकटात मिळाल्या चक्क ५ धावा
केरला ब्लास्टर्सची अपराजित मालिका कायम, ओदिशाला नमवून अव्वल क्रमांकावर झेप!
व्हिडिओ पाहा –