दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जात आहे. हा सामना जिंकण्यासाठी यजमान संघाला 148 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. मात्र तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेने 27 धावांवर तीन महत्त्वाचे गडी गमावले आहेत. चौथ्या दिवशी विजयासाठी आफ्रिकन संघाला 121 धावांची गरज असून या लक्ष्याचा पाठलाग करून संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (WTC) फायनलचे तिकीट मिळू शकते. होय, दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपासून फक्त एक विजय दूर आहे. कर्णधार टेम्बा बावुमा एडेन मार्करामसह क्रीजवर उपस्थित आहे. त्यांच्या हातात 7 विकेट शिल्लक आहेत.
सध्याच्या डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलबद्दल बोलायचे झाले तर दक्षिण आफ्रिका 63.33 टक्के गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. सेंच्युरियन कसोटीत पाकिस्तानला पराभूत करण्यात संघ यशस्वी ठरला तर त्यांच्या खात्यात 66.66 टक्के गुण जमा होतील आणि त्यांना अंतिम फेरीचे तिकीट सहज मिळू शकेल. सध्या 58.89 टक्के गुणांसह ऑस्ट्रेलिया दुसऱ्या तर 55.88 टक्के गुणांसह भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या दोघांमध्ये डब्ल्यूटीसी अंतिम फेरी गाठण्यासाठी शर्यत असेल.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या डावानंतर 90 धावांनी पिछाडीवर पडलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाने दुसऱ्या डावात सौद शकील (84) आणि बाबर आझम (50) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 237 धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जेन्सनने सर्वाधिक 6 बळी घेतले. पाकिस्तानच्या या दोन सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंना त्यानेच बाद केले.
तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला पाकिस्तान संघ 211 धावांत आटोपला. कामरान गुलामने संघाकडून सर्वाधिक 54 धावा केल्या, त्याच्याशिवाय कोणीही 30 धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेसाठी डॅन पॅटरसनने आपले पंजे उघडले होते, तर कॉर्बिन बॉशने 4 बळी घेतले होते.
हेही वाचा-
पावसामुळे मेलबर्न कसोटीची मजा खराब होईल? पुढील 2 दिवसाचं हवामान जाणून घ्या
नितीश रेड्डीच्या शतकानंतर रवी शास्त्रींना अश्रू आवरेना, कॉमेंट्री बॉक्समधील भावनिक फोटो समोर
नितीश कुमार रेड्डीवर पैशांचा वर्षाव, शतक झळकावताच मिळालं मोठं बक्षीस