विश्वचषक 2023चा चौथा सामना दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकी फलंदाजांनी श्रीलंकन गोलंदाजांचा अक्षरशः घाम काढला. क्विंटन डी कॉक, रासी वॅन डर ड्युसेन आणि ऍडन मार्करम या तिघांनी शतकी खेळी केली आणि संघाची धावसंख्या 5 बाद 428 धावांपर्यंत पर्यंत पोहोचवली. विश्वचषकाच्या इतिहासातील ही एखाद्या संघाची सर्वोत्तम धावसंख्या ठरली.
दक्षिण आफ्रिकेसाठी या सामन्यात सलामीली आलेल्या क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) याने 84 चेंडूत 100 धावा केल्या. तसेच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या रासी वॅन डर ड्युसेन (Rassie van der Dussen ) याने 110 चेंडूत 108 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तसेच ऍडन मार्करम (Aiden Markram) याने अवघ्या 54 चेंडूत 106 धावांची खेळी केली. शेवटच्या षटकांमध्ये डेविड मिलर (David Miller) धावांचा अक्षरशः पाऊस पाडला. अवघ्या 21 चेंडूत 39 धावा करून मिलरने फिनिशरची भूमिका पुन्हा एकदा चोख पार पाडली.
वनडे विश्वचषकाच्या इतिहास सर्वोत मोठी धावसंख्या यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या नावावर होती. ऑस्ट्रेलियाने 2015 विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध 417 धावांची सर्वोत्तम खेळी केली होती. शनिवारी (7 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलियाचा हा विक्रम मोडीत काढला आणि विश्वचषकातील सर्वोत्तम खेळी आपल्या नावावर केली. दक्षिण आप्रिकेचा मध्यक्रमातील फलंदाज ऍडन मार्करम यानेही मोठा विक्रम नावावर केला. मार्करम आता अवघ्या 49 चेंडूत शतक केले, जे विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात वेगवान शतक ठरला आहे. याआधी हा विक्रम 50 चेंडूत शतक ठोकणाऱ्या केविन ओब्रायन याच्या नावावर होता.
उभय संघांतील या सामन्यात एकंदरीत विचार केला, तर दक्षिण आफ्रिकेसाठी सलामीवीर आणि कर्णधार टेम्बा बावुमा यांने अवघ्या 8 धावा करून विकेट गमावली. हेनरिक क्लासेन याने 32, डेविड मिलर 39* आणि मार्को जॅनसन याने 12* धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. गोलंदाजी विभागात श्रीलंकेसाठी सर्वाधिक 2 विकेट्स घेऊ शकला दिलशान मदुशंका याने. कुसल मेंडिस, मथिशा पथिराना आणि दुनिथ वेल्लालागे यांनीही प्रत्येक एक-एक विकेट घेतली. (SA vs SL । World Cup 2023 । SOUTH AFRICA NOW HAS THE HIGHEST TEAM TOTAL IN WORLD CUP HISTORY)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुन्गी एन्गिडी.
श्रीलंका – पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शानाका (कर्णधार), दुनिथ वेललागे, कसुन राजिथा, दिलशान मदशाना, दिलशाना मदुशंका, माथेशा पाथीराना.
महत्वाच्या बातम्या –
हॅंगझूमध्ये भारतीय पथकाची ऐतिहासिक कामगिरी! तब्बल 107 पदकांसह चौथ्या स्थानी संपवले अभियान
कशी चाललीय टीम इंडियाची तयारी अन् शुबमनच्या फिटनेसचं काय? रोहित स्पष्टच बोलला…