साऊथ आफ्रिका टी-20 लीगमध्ये शनिवारी रात्री सनरायझर्स इस्टर्न केप आणि डर्बन सुपर जायंट्स यांच्यात SA20 चा अंतिम सामना खेळवला गेला. तसेच काव्या मारनचा संघ सलग दुसऱ्या वर्षी दुसरी फायनल खेळत सनरायझर्सने इतिहास रचला आहे. या सामन्यात त्यांनी अंतिम फेरीत डर्बन संघाचा ८९ धावांनी पराभव करत सनरायझर्स इस्टर्न केप संघ सलग दुसऱ्यांदा SA20 चॅम्पियन बनला आहे.
सनरायझर्स इस्टर्न केप आणि डर्बन सुपर जायंट्सच्या अंतिम सामन्यात सनरायझर्स इस्टर्न केपने डर्बनसमोर २०५ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. तर, ईस्टर्न केपकडून ट्रिस्टन स्टब्सने सर्वाधिक ५६ धावा केल्या. तोही शेवटपर्यंत नाबाद राहिला. याशिवाय टॉम एबेलने ५५ धावा केल्या आणि कर्णधार एडन मार्करामनेही ४२ धावांची चांगली खेळी केली. डर्बन सुपर जायंट्सचा कर्णधार केशव महाराजने संघाकडून सर्वाधिक २ विकेट घेतले. रीस टोपलीलाही १ विकेट घेण्यात यश मिळाले आहे.
याबरोबरच, एडन मार्करमच्या नेतृत्त्वाखालील सनरायजर्स ईस्टर्न केप संघाने सलग दुसऱ्यांदा SA20 चा खिताब जिंकला असून या टूर्नामेंटच्या पहिल्या सीझनचा विजेताही सनरायजर्स ईस्टर्न केप संघ होता. तसेच, संघाची मालकीण काव्या मारनने फायनलमध्ये सनरायझर्सच्या शानदार विजयावर आनंद व्यक्त केला आहे.
Kavya Maran handing the trophy to Aiden Markram.
A beautiful picture! pic.twitter.com/urskyGFwHJ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 11, 2024
तसेच, संघाची मालकीण काव्या मारन नेहमीच चर्चेत असते. तर प्रत्येक चेंडूवर प्रतिक्रिया देणाऱ्या काव्याच्या संघाने सलग दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिका टी-20 लीगचे जेतेपद पटकावले तेव्हा तिची प्रतिक्रिया बघण्यासारखी होती. तसेच या अंतिम सामन्यात २०५ धावांचे मोठे लक्ष्य डर्बन सुपर जायंट्स संघ पार करण्यात अयशस्वी ठरला आणि १७ षटकांत ११५ धावा करून सर्वबाद झाले आहेत.
Kavya Maran Mam has something to say 🗣️🧡
.
.
.#Sec #SunrisersEasternCape #Orangeramy pic.twitter.com/UbS6uiWVBy— SunRisers OrangeArmy Official (@srhfansofficial) February 10, 2024
दरम्यान, डरबनकडून वियान मुल्डरने सर्वाधिक ३८ धावा केल्या. यानंतर ड्वेन प्रिटोरियसनेही २८ धावा केल्या. सनरायझर्सच्या मार्को यान्सनने शानदार कामगिरी केली. डॅनियल वॉरॉल आणि ओटनिल बार्टमनने २-२ विकेट घेतल्या. सायमन हार्मरलाही १ विकेट मिळाली. तर हा आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादचा संघ आहे.
महत्वाच्या बातम्या –
Prithvi Shaw : शतक ठोकल्यानंतर पृथ्वी शॉचे धक्कादायक वक्तव्य ; म्हणाला ‘टीम इंडियात…
IPL 2024 MI : रोहित शर्माची रितिकाच्या ‘त्या’ कमेंट्सनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…