भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. परंतु आयसीसीच्या स्पर्धांमध्ये तो भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. परंतु अंतिम सामन्यात त्यांना विजय मिळवता आला नाही.
नुकत्याच पार पडलेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्युझीलंड संघाने भारतीय संघावर ८ गडी राखून विजय मिळवला होता. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत आता माजी भारतीय यष्टिरक्षक फलंदाजाने भाष्य केले आहे.
इंडिया न्यूज स्पोर्ट्ससह चर्चा करताना माजी भारतीय यष्टिरक्षक फलंदाज सबा करीम यांनी म्हटले की, “जर भारतीय संघाला आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकण्यात यश आले. तर विराट कोहलीसाठी ही दिलासादायक बाब असेल. परंतु पराभूत झाल्यास विराट कोहलीच्या चिंतेत वाढ होऊ शकते. टी-२० विश्वचषक स्पर्धा कोहलीच्या कर्णधारपदाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची स्पर्धा असेल. त्याच्यावरील दबाव वाढत चालला आहे. कारण त्यालाही माहीत आहे की, त्याला आयसीसीची ट्रॉफी जिंकण्यात यश आले नाही. त्यामुळे त्याचे लक्ष्य आयसीसीची ट्रॉफी जिंकणे हेच असेल.” (Saba Karim big statement on indian captain Virat Kohli)
तसेच ते पुढे म्हणाले की, “जर भारतीय संघाला ट्रॉफी जिंकण्यात यश आले तर हे विराट कोहलीसाठी दिलासादायक असेल. तसेच, त्याला कर्णधारपद म्हणून कारकीर्द सुरू ठेवायची की नाही? याबाबत विचार करण्यासाठीही पुरेसा वेळ मिळेल. त्याचे नाव सर्वोत्तम कर्णधारांमध्ये येते परंतु अद्याप त्याच्या नावे एकही आयसीसी ट्रॉफी नाही.”
ऑक्टोबरमध्ये रंगणार टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार
यापूर्वी टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यात येणार होते. परंतु ही स्पर्धा आता १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये रंगणार आहे. आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा संपताच क्रिकेट चाहत्यांना टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
भयावह प्रसंग! लाईव्ह सामन्यात अचानक विंडीजच्या २ खेळाडूंना आली चक्कर, रुग्णालयात केलं भरती
श्रीलंका दौऱ्यानंतर इंग्लंडला उड्डाण भरणार ‘हा’ भारतीय सलामीवीर, घेणार शुबमनची जागा?
धवन ब्रिगेडला ‘दुय्यम दर्जा’चा संघ संबोधणाऱ्या क्रिकेटरला श्रीलंका बोर्डाचे सणसणीत उत्तर