भारतामधील प्रत्येक राज्यात चाहत्यांना मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे वेड आहे आणि क्रिकेटमध्ये त्या राज्यांमध्ये खूप सुधारणाही पाहायला मिळते. परंतु बिहारमधील परिस्थिती थोडी वेगळी दिसते. बिहारमध्ये खेळाडूंना खेळण्यासाठी पुरेशी मैदानेही नाहीत. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक फलंदाज सबा करीम (saba karim) यांनी निशाणा साधला आहे. एका कार्यक्रमासाठी पटानामध्ये पोहोचल्यानंतर सबा करीम यांनी बिहारमधील क्रिकेटची अवस्था आणि बिहार क्रिकेट असोसिएशनवर टीका केली आहे.
सबा करीम यांच्या मते बीसीसीआय अनेक राज्यांना फंड देते आणि त्यातून त्याठिकाणी स्टेडियम तयार केले गेले आहेत. परंतु बिहारमध्ये अशी परिस्थिती नाहीय. ते म्हणाले की, “राज्यात क्रिकेटची दशा आणि दिशा दोन्ही खराब आहे. बीसीसीआयकडून क्रिकेट असोसिएशनला जो फंड मिळतो, त्याचा योग्य उपयोग न झाल्यामुळे बिहार क्रिकेट आज खूप मागे आहे. इथे खेळ कमी आणि राजकारण जास्त आहे. हेच कारण आहे की, आज अनेक राज्य खेळ आणि खेळाडूंच्या क्षेत्रात बिहारपेक्षा खूप पुढे आहेत.”
सबा करीमने पटनाचा उल्लेख करत सांगितले की, राज्याच्या राजधानीत एकमात्र स्टेडियम आहे, पण तेही प्रायव्हेट आहे. जे लोक बिहार क्रिकेट असोसिएशनमध्ये बसले आहेत, त्यांच्यासोबत बोलने किंवा त्यांना समजून घेणे अवघड आहे. बिहार क्रिकेटमध्ये हित आणि अहंकाराचा संघर्ष आहे. खेळाडूंचा ज्यामुळे नुकसान भोगावे लागत आहे. येणाऱ्या काळात बिहारवर नजर असेल, परंतु खेळाचे मैदान असणे गरजेचे आहे, जिथे खेळाडू खेळू शकतील आणि सराव करू शकतील.
यावेळी बोलताना त्यांनी बिहार क्रिकेटच्या निवड प्रक्रिकेयवर देखील प्रश्न उपस्थित केले. करीम भारतीय संघाच्या निवडसमितेची माजी सदस्य आहेत. त्यांच्या मते निवड प्रक्रिया पूर्णपणे खेळाडूंवर अवलंबून असते. ते असे खेळतात, अशा प्रकारे खेळतात. त्यानंतर अनेकांमधून एकाची निवड करायची असते. ते म्हणाले की, “जेव्हा इतर संघ स्पर्धेसाठी सराव करत असतात, तेव्हा बिहारमध्ये संघाची घोषणाही झालेली नसते. जेव्हा संघ रवाना होणार असतो, तेव्हा खेळाडूंची नावे समोर येतात. पुढे येण्यासाठी बिहारला या मुद्यावर गंभीरपणे विचार करावा लागणार आहे.”
महत्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२२ पूर्वी धोनीचा कोट्यधीश गोलंदाज चर्चेत, फक्त ७ षटकांमध्ये संघाचा विजय केलाय निश्चित
‘हा’ माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर बनला अफगाणिस्तानचा प्रशिक्षक, बांगलादेश दौऱ्यावर स्विकारणार जबाबदारी
मेहनत फळाला आली! मोठ्या प्रतीक्षेनंतर आवेश खानला मिळाली ‘इंडिया कॅप’