---Advertisement---

‘शमी नव्हेतर या गोलंदाजाला द्यावी विश्वचषकात संधी’; माजी निवडकर्त्याने सुचविला पर्याय

---Advertisement---

टी20 विश्वचषक सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस उरले असून, विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पाठीच्या स्ट्रेस फ्रॅक्चरच्या बातम्यांमुळे सध्या संघ व्यवस्थापनाची चिंता वाढलीये. बुमराहला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेतून वगळण्यात आले असून, तो टी20 विश्वचषकातून जवळपास बाहेर गेला आहे. आता त्याच्या जागी कोणाला संधी देण्यात यावी याबाबत भारताचे माजी यष्टीरक्षक सबा करीम यांनी आपले मत नोंदविले आहे.

बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर मोहम्मद सिराजची या मालिकेसाठी भारतीय संघात निवड केली गेली आहे. मात्र, विश्वचषकासाठी बुमराहचा बदली खेळाडू कोण असेल याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. विश्वचषकासाठी संघात मोहम्मद शमी व दीपक चहर यांना राखीव खेळाडू म्हणून जागा मिळाली असून, त्या दोघांपैकीच एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावर बोलताना सबा करीम म्हणाले,

“अनेकांची इच्छा आहे की मोहम्मद शमी याची संघात निवड केली जावी. मात्र, मला वाटते ती जागा दीपक चहरला मिळावी.”

दीपक चहर हा चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने अप्रतिम गोलंदाजी करत भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती.

जसप्रीत बुमराह जुलै महिन्यातील इंग्लंड दौऱ्यानंतर कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळला नव्हता. तो पाठीच्या दुखापतीतून सावरत असल्याने संघ व्यवस्थापनाने त्याला विश्रांती दिली होती. टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सहभागी करून घेण्यात आले. तो मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना खेळला. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका सुरू होताच त्याचे दुखण्याने पुन्हा उचल खाल्ली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
T20 Word Cup 2022: स्पर्धेच्या काही दिवसांआधीच भारत ब्रिसबेनमध्ये ठोकणार तळ! जाणून घ्या कारण
ब्रेकिंग! जसप्रीत बुमराहच्याजागी भारताच्या टी20 संघात ‘या’ वेगवान गोलंदाजाची एंट्री 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---