---Advertisement---

“आता बुमराह-शमीच्या पुढे पाहायची वेळ आलीये”

On: शुक्रवार, डिसेंबर 9, 2022 2:24 PM
Jasprit-Bumrah-Mohammad-Shami
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. हा दौरा छोटेखानी असला तरी या दौऱ्यावर आपला मजबूत संघ बीसीसीआयने पाठवला होता. मात्र, वनडे मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारताला गमवावे लागले. असे असतानाच खेळाडूंच्या दुखापतींनी देखील बीसीसीआय व संघ व्यवस्थापन त्रस्त आहे. त्याचवेळी आता भारताचे माजी क्रिकेटपटू व माजी निवडसमिती सदस्य सबा करीम यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले.

सध्या भारतीय संघातील अनेक खेळाडू दुखापतींशी झुंज देत आहेत. जसप्रीत बुमराह हा बराच काळ दुखापतीमुळे संघा बाहेर होता. आशिया चषकानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याने पुनरागमन केले. मात्र, दोनच सामने खेळून तो पुन्हा दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर अद्याप तो यातून सावरला नाही. अष्टपैलू रवींद्र जडेजा हा देखील दुखापतीमुळेच आशिया चषकापासून भारतीय संघाच्या बाहेर आहे. तर, अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा देखील पूर्णपणे तंदुरुस्त नाही. त्यानंतर आता कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज दीपक चहर व कुलदीप सेन हे देखील दुखापतींमुळे बांगलादेश दौऱ्यातून बाहेर झालेत.

याच एकूण पार्श्वभूमीवर बोलताना सबा करीम यांनी अतिशय महत्त्वपूर्ण विधान केले. ते म्हणाले,

“बुमराह व शमी वारंवार दुखापतग्रस्त होत असतात. मला व्यक्तिशः वाटते आता आपल्याला त्यांच्या पुढे जाऊन विचार करण्याची गरज आहे. युवा वेगवान गोलंदाजांची एक फळी निर्माण करून, त्यांना सातत्याने संधी द्यावी लागेल. फिरकी गोलंदाजांच्या बाबतीतही मी हाच सल्ला देईल. जे खेळाडू तुमच्या नजरेत आहेत त्यांना पुरेपूर संधी मिळायला हवी.”

बांगलादेश दौऱ्यावर भारतीय संघ शनिवारी अखेरचा वनडे सामना खेळेल. त्यानंतर 14 डिसेंबरपासून दोन्ही संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल.

(Saba Karim Said We Need To Think Ahead Bumrah And Shami)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तिसऱ्या वनडेपूर्वी भारतीय संघात मोठे बदल; रोहितची घरवापसी तर ‘हा’ खेळाडू असेल कर्णधार
बाबो केवढा तो कॉन्फिडन्स! ‘मी न खेळता डाव घोषीत करेल’, बेन स्टोक्सचे खळबळजनक विधान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---